spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Deepika Padukone ने बाळासाठी घेतला मोठा निर्णय, नाकारली मोठी इंटरनॅशनल ऑफर, तर स्वत: करणार संगोपन…

बॉलिवूडची सुपरस्टार अभिनेत्री दीपिका पादुकोण (Superstar actress Deepika Padukone) आता लवकरच आई होणार आहे.

बॉलिवूडची सुपरस्टार अभिनेत्री दीपिका पादुकोण (Superstar actress Deepika Padukone) आता लवकरच आई होणार आहे. दीपिका ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. परंतु सध्या ती तिच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आहे. दीपिका तिच्या बाळाची आतुरतेने वाट पाहत आहे. दीपिका प्रेग्नेंट असून सध्या हा काळ इन्जॉय करत आहे. सप्टेंबर महिन्यात अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंह पहिल्या बाळाचं स्वागत करणार आहेत. दीपिका अलिकडेच कल्कि 2898 एडी (Kalki 2898 AD) चित्रपटात झळकली होती. कल्कि चित्रपटाच्या शूटिंग वेळी दीपिका प्रेग्नेंट होती. सध्या दीपिका फिल्म इंडस्ट्रीच्या शेड्युलपासून दूर असून तिची आणि बाळाच्या तब्येतीची काळजी घेत आहे. तसेच सध्या कोणत्याच सिनेमात अभिनेत्रीने काम न करण्याचा निर्णय अभिनेत्रीने घेतला आहे. प्रेग्नेंसीमुळे गेल्या काही दिवसांपासून दीपिका चर्चेत असणाऱ्या अभिनेत्रीने डिलिव्हरीनंतर मोठा निर्णय घेतला आहे.

अभिनेत्री दीपिका पादुकोण आई होण्यासाठी सध्या खूप उत्सुक आहे. तिला मुलं खूप आवडतात आणि हे तिच्या चाहत्यांना हे चांगलंच माहीत आहे. प्रसूतीनंतर दीपिकाला मातृत्वाच्या प्रवासाचा पुरेपूर आनंद घ्यायचा आहे. त्यामुळे तिने एक मोठा आणि महत्वपूर्ण निर्णय हा घेतला आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या तिच्या होणाऱ्या बाळाची काळजी घेत निवांत वेळ घालवत आहे. अशात प्रेग्नेंसीनंतर दीपिका मोठ्या पडद्यावर पुनरागमन केव्हा करणार, असा प्रश्न तिच्या चाहत्यांना प्रश्न पडला आहे. काही चाहत्यांनी अंदाज बांधायला सुरुवात केली आहे की, दीपिका इतर अभिनेत्रींप्रमाणे प्रेग्नेंसीनंतर लगेचच पुन्हा कामाला सुरुवात करणार आहे. पण, याबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे.

दीपिका पादुकोण प्रेग्नेंसीनंतर लगेचच काम करण्याच्या विचारात नाही. दीपिकानं होणाऱ्या बाळासाठी एक मोठी इंटरनॅशनल ऑफर नाकारली आहे. दीपिकाने एक मोठी आंतरराष्ट्रीय ऑफर तर नाकारलीच पण आपल्या बाळाची काळजी ती स्वतःच घेण्याचं ठरवलं आहे. दीपिका पादुकोणनं द व्हाईट लोटस या इंटरनॅशनल वेब सीरिजची ऑफर नाकारली आहे. प्रेग्नेंसीनंतर दीपिका लगेचच कामावर परतणार नाही, तर बाळाची संगोपन करणार आहे. दीपिका कोणाच्या मदतीशिवाय बाळाचा सांभाळ करणार आहे. म्हणजे इतर सेलिब्रिटींप्रमाणे दीपिका बाळाचा सांभाळ करण्यासाठी नॅनी ठेवणार नसल्याची माहिती समोर येत आहे. एवढंच नाही तर, आई झाल्यानंतर दीपिका पती रणवीर सिंग याची देखील मदत घेणार नसल्याची माहिती समोर येत आहे. कारण अभिनेत्रीला स्वतः होणाऱ्या बाळासाठी सर्वकाही करायचं आहे. तर दीपिका पादुकोन आणि रणवीर सिंग यांनी मार्च महिन्यात प्रेग्नेंसी अधिकृत घोषणा सोशल मीडियाच्या माध्यमातून केली. एक खास पोस्ट शेअर करत दोघांनी आनंद चाहत्यांसोबत शेअर केला. शिवाय अनेक ठिकाणी दीपिका बेबी बम्प देखील फ्लॉन्ट करताना दिसली.

हे ही वाचा:

Pune Monsoon Updates: दुर्घटना टाळण्यासाठी स्वत:सह कुटुंबाची काळजी घ्या, Ajit Pawar यांचे नागरिकांना आवाहन

पूर परिस्थितीत प्रशासन मदतीसाठी फिल्डवर, बचाव कार्य सुरू CM Shinde यांची माहिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss