spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी विमानाचं टेकऑफ लांबवलं? – आयुष्मान खुराणा

संपूर्ण जगातुन क्रिकेट प्रेमींची आकडेवारी काढली तर भारटाचा क्रमांक पहिला असेल यात काही शंकाच नाही, काल भारत- पाकिस्तान सामन्यात भारतीय संघाने दणदणून विजय मिळवत टी २० विश्वचषकाची सुरुवात दणक्यात केली आहे. भारतीय संघाच्या या विजयानंतर देशभरात जल्लोष साजरा केला जात आहे. नुकतीच अभिनेता आयुष्मान खुरानानं (Ayushmann Khurrana ) एक ट्वीट शेअर केलं आहे .या ट्विट मध्ये त्याने चाहत्यांना त्याच्याबरोबर घडलेला एक किस्सा सांगितलं आहे .

आयुष्मान कुराणाच्या चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. तर आता ड्रीम गर्ल २ हा आयुष्मानचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ड्रीम गर्ल २ या चित्रपटात आयुष्मानसोबत बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी त्याचा डॉक्टर जी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

आयुष्यामानबरोबरच अनेक कलाकारांनी कालच्या सामन्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन आनंद व्यक्त केला. अभिषेक बच्चन, प्रीती झिंटा,जावेद अख्तर,मुनव्वर फारुकी,वरुण धवन, अनुष्का शर्मा या सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या. तसेच अनेक नेटकऱ्यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या.कार्तिक आर्यनने ट्विट करत सांगितले कि “एकच राजा आहे @imVkohli, काय सामना आहे ….भारतिय संघ चांगला खेळला खरंच दिवाळीच्या शुभेच्छा. अश्या प्रकारे अनेक अभिनेते,खेळाडू , व सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या आहेत .

आयुष्मान खुराणा हा काल एका काम संधार्बतन मुंबईहून चांदीगाड ला जात होता त्यावेळी विमानात असतानाच एक किस्सा त्याने ट्विट करत चाहत्यांना सांगितलं आहे त्याने तीत मध्ये अस लिहिले आहे कि ,”ही कथा माझ्या भावी पिढ्यांसाठी आहे. मी मुंबई-चंदीगड फ्लाइटमधील शेवटची दोन षटके टेक ऑफ करण्यापूर्वी प्रवाशांसोबत त्यांच्या मोबाईलला चिकटून पाहिली. मला खात्री आहे की क्रिकेटच्या कट्टर पायलटने मुद्दाम ५ मिनिटांनी उशीर केला आणि कोणीही तक्रार केली नाही.”

हे ही वाचा :

IND vs PAK T20 World Cup 2022 : भारत जिंकला ! पुणे, कोल्हापूरसह राज्यात अनेक ठिकाणी अभूतपूर्व जल्लोष

१०० हून अधिक खासदारांचा ऋषी सुनक यांना पाठिंबा ; पंतप्रधानपद जवळपास निश्चित

कुरुक्षेत्र असो की लंका – युद्ध हा शेवटचा पर्याय; पंतप्रधान मोदी कारगिलमध्ये दिवाळीनिमित्त सैनिकांना

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss