spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

दिल्लीच्या हृदयद्रावक घटनांची खरी कहाणी, दिल्ली क्राईम २ सिजनचा प्रदर्शित

सर्वात प्रसिद्ध ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सच्या सर्वात लोकप्रिय वेब सीरिजपैकी एक असलेल्या ‘दिल्ली क्राइम’चा सीझन २ खूप चर्चेत आहे. त्याचा पहिला सीझन पाहणारे चाहते बऱ्याच दिवसांपासून दुसऱ्या सीझनची वाट पाहत होते, जे आता संपले आहे. दिल्ली क्राइम सीझन २ चा ट्रेलर ८ ऑगस्ट रोजी रिलीज झाला होता तर, आज दिल्ली क्राईम सीझन २ नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. या मालिकेचे दिग्दर्शन तनुज चोप्राने केले आहे. ही वेब सिरीज खळबळजनक गुन्ह्यावर आधारित आहे.

दिल्ली क्राइम

‘दिल्ली क्राइम’चा पहिला सीझन दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणावर आधारित होता आणि प्रेक्षकांना तो खूप आवडला होता. गेल्या सीझनमध्ये अभिनेत्री शेफाली शाह मुख्य भूमिकेत दिसली होती आणि तिने साकारलेली बोल्ड व्यक्तिरेखा सर्वांनाच आवडली होती. यावेळी ‘दिल्ली क्राइम सीझन 2’ मध्ये देखील मॅडम सर उर्फ ​​शेफाली शाह दिसणार आहे.

क्रिमिनल जस्टिस ३ ; पंकज त्रिपाठीची वेब सिरीज लाँच पण, चाहत्यांनी संताप केला व्यक्त

दिल्ली क्राइम सीझन २

‘दिल्ली क्राईम सीझन 2’ चे कथानक दिल्लीतील वृद्धांना सतत टार्गेट करणार्‍या ‘कच्छा बन्या’ टोळीबद्दल आहे. या टोळीला बाबरिया टोळी असेही संबोधले जाते, जी रात्रीच्या वेळी घरात घुसून दरोडा टाकून धारदार शस्त्राने लोकांची निर्घृण हत्या करत असे. या वेब सिरीजनुसार, एक काळ असा होता जेव्हा या टोळीची खूप दहशत असायची. मात्र, दिल्लीसह अन्य राज्यांच्या पोलिसांनी या टोळीतील अनेकांना अटक करून तुरुंगात पाठवले होते.

‘दिल्ली क्राइम सीझन 2’ च्या ट्रेलरमध्ये दक्षिण दिल्लीच्या डीसीपी वर्तिका चतुर्वेदीच्या भूमिकेतील शेफाली शाहची व्यक्तिरेखा मागच्या वेळेप्रमाणेच लोकांना खूप प्रभावित करत आहे. या मालिकेत शेफाली शाहसोबत रसिका दुग्गल, राजेश तैलंग, तिलोतमा शोम आणि आदिल हुसैन हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

‘राडा’ सिनेमात झळकणार ‘जीव माझा गुंतला फेम योगिता चव्हाण

Latest Posts

Don't Miss