spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Delhi Kanjhawala Accident, बॉलीवूड बादशाह शाहरुख खानने अंजलीच्या कुटुंबियांसाठी केला मदतीचा हात पुढे

अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा सध्या त्याच्या पठाण (Pathan) या आगामी चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. तसेच शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) पठाण हा चित्रपट वादातही अडकला होता. बॉलीवूड बादशाह हा अनेक कारणांमुळे चर्चेत आला आहे. तसेच शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा गुप्तपणे अनेक लोकांना आर्थिक मदत करतो अशी चर्चा सुरु होती. तसेच शाहरुख खान (Shah Rukh Khan) याने कोरोनाच्या काळातही अनेक गरजू लोकांना आर्थिक मदत केली होती. शाहरुखने त्याचे वडील मीर ताज मोहम्मद खान यांच्या नावाने एक फाउंडेशनची स्थापना केली. ज्याचे नाव मीर फाउंडेशन असे आहे. शाहरुख खान या फाउंडेशनच्या साहाय्याने अनेक लोकांना मदत करतो. तसेच शाहरुख खानच्या या मीर फाउंडेशने (Meer Foundation) दिल्लीतील अंजली सिंग (Anjali singh) या २० वर्षीय तरुणीच्या कुटुंबियांना आर्थिक मदत केली आहे.

वर्षाच्या पहिल्याच दिवशी दिल्लीमधील कंझावाला येथे राहणाऱ्या तरुणीला एका कर चालकाने जवळपास १२ किलोमीटर फरफटत नेलं होत. अंजलीचा मृतदेह हा अत्यंत दुर्दैवी अवस्थेत पोलिसांना सापडला.या तरुणीचे नाव अंजली सिंग असे आहे. या वेदनादायक अपघातानंतर अंजलीला आपला जीव गमवावा लागला. शाहरुख खानच्या एनजीओ मीर फाऊंडेशनने २० वर्षीय तरुणी अंजली सिंगच्या कुटुंबाला आर्थिक मदत केली आहे. शाहरुख खान हा वेळोवेळी गरजूंना मदत करण्यासाठी पुढे येतो. तळागाळातील लोकांना मदत करणे आणि बदल घडवून आणणे असे शाहरुख खानच्या मीर फाउंडेशने या एनजीओचे उद्दिष्ट आहे.

२५ जानेवारी २०२३ ला शाहरुख खानचा पठाण हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहरूख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहाम मुख्य भूमिकेत आहेत. पण गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूड बादशाह शाहरुख खानचा पठाण चित्रपटातील बेशरम रंग या गाण्यामुळे चित्रपटाला ‘बॉयकॉट’ करण्याची मागणी सोशल मीडियावर करण्यात येत आहे. पण निर्मात्यांच्या सांगण्यानुसार चित्रणात बदल करणार आल्याचेही सांगितले आहे.

दरम्यान शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट ‘बॉयकॉट’ करण्याची मागणी सोशल मीडियावर करण्यात येत आहे. येत्या २५ जानेवारी २०२३ ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहरूख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहाम मुख्य भूमिकेत आहेत.

हे ही वाचा:

संजय शिरसाटांचा खळबळजनक दावा, ८ ते १० दिवसात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का देणार

जोशीमठमध्ये ५६१ घरांना तडे तर जमीनसुद्धा जातेय पाण्याखाली, जाणून घ्या समस्येमागची खरी कहाणी

अपघातानंतर योगेश कदम यांची पहिली प्रतिक्रिया, अपघातासंदर्भात केला संशय व्यक्त

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss