‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटावर बहिष्काराची मागणी असताना, करीना कपूर म्हणाली…

‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटावर बहिष्काराची मागणी असताना, करीना कपूर म्हणाली…

Lal singh chaddha : हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते अमीर खान व अभिनेत्री करीना कपूर यांच्या आगामी चित्रपट ‘लाल सिंग चड्ढा’ हा वादाच्या कचाट्यात सापडला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून, ट्विटरवर वेळोवेळी बॉयकॉट लाल सिंग चड्ढा हा हॅशटॅग ट्रेंड करत आहे. नुकतेच आमिर खानने चित्रपटाविरोधात झालेल्या निदर्शनांबद्दल दु:ख व्यक्त केले. त्याच बरोबर अभिनेत्री करीना कपूर हिने देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. करीना म्हणाली, “आजकाल प्रत्येकाचे स्वतःचे असे स्वतंत्र मत असते, पण एक चांगला चित्रपट कोणत्याही गोष्टीवर मात करू शकतो असा तिने विश्वास व्यक्त केला.

हेही वाचा : 

मुख्यमंत्री पुण्याकडे रवाना, आज ठाकरे व शिंदे एकाच पिचवर

2015 मध्ये असहिष्णुतेवर केलेल्या वक्तव्यामुळे आमिर खानच्या चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणी करण्यात आली होती. लाल सिंग चड्ढा या चित्रपटातून आमिर तब्बल चार वर्षांनी बॉलिवूडमध्ये कमबॅक करत आहे. अशा परिस्थितीत ट्विटरवर त्यांचे जुने वक्तव्य घेऊन काही नेटकरी त्यांच्यावर निशाणा साधत आहेत.

मुख्यमंत्री पुण्याकडे रवाना, आज ठाकरे व शिंदे एकाच पिचवर

Exit mobile version