spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

देवेंद्र फडणवीसांनी लिहिलेलं गाणं अमृता फडणवीसांनी गायलं,नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला    

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी गायिका अमृता फडणवीस या नेहमीच कोणत्यान कोणत्या कारणांमुळे चर्चेत येत असतात.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी गायिका अमृता फडणवीस या नेहमीच कोणत्यान कोणत्या कारणांमुळे चर्चेत येत असतात.कधी त्यांच्या वादग्रस्त पोस्टमुळे तर कधी त्यांच्या फॅशनमुळे देखील ते चर्चेत येत असतात.अमृता फडणवीस याचे नवनवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात.त्यांच्या गाण्याला प्रेक्षकही चांगला प्रतिसाद देतात.तर नुकतच अमृता फडणवीसांचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. अमृता फडणवीस या सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात.ते त्यांचे पोस्ट आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात.अमृता यांचा चाहता वर्ग देखील बराच मोठा आहे.

दरम्यान अमृता फडणवीस यांचे नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. हे गाणे देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलं असून या गाण्याला अजय-अतुल यांनी संगीत दिलं आहे. सध्या देवेंद्रजी आणि अमृता फडणवीस यांच्या या नव्या गाण्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.राम नाम  असं देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या गाण्याचे नाव आहे. या गाण्याचा कोरस उमेश जोशी, विजय धुरी, जनार्दन धात्रक, संतोष बोटे, यश कुलकर्णी, यशद घाणेकर, सौरभ वखारे, विदित पाटणकर, प्रगती जोशी, आरोही म्हात्रे, मृण्मयी दडके, मानसी परांजपे, शमिका भिडे, शरयु राजकुमार दाते, राजकुमार चव्हाण यांनी गायला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या या गाण्याला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.

अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियावर राम नाम या गाण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करुन त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, “अजय-अतुल यांच्या मनमोहक रचनेसह देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या या मंत्रमुग्ध करणाऱ्या राम भजनाचा एक भाग होताना आनंद झाला.”राम नाम या गाण्याला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, “खुप छान गाणं लिहिलं आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि अपेक्षेप्रमाणे छान संगीत आहे.” तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, अजय-अतुल सँल्युट तुम्हाला, काय कंपोजिशन आहे.”

झी म्युझिक कंपनी या युट्यूब चॅनलवर शेअर करण्यात आलेल्या राम नाम या गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या गाण्याला आतापर्यंत 83 हजारपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर एक हजारपेक्षा जास्त नेटकऱ्यांनी या गाण्याला लाइक आणि कमेंट्स केले आहेत.याआधी देखील अमृता फडणवीस यांच्या आलेल्या प्रत्येक गाण्याला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला आहे.

हे ही वाचा:

अभिनेता अक्षय कुमार ठरला डीपफेक व्हिडिओचा शिकार, व्हिडिओ व्हायरल

यंदाच्या ‘व्हेलेंटाईन डे’ पार्टनरला गिफ्ट द्या ‘या’ खास भेटवस्तू

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss