“धर्मवीर २” चा बॉक्सऑफिसवर धमाका, पहिल्याच दिवशी रेकॉर्ड ब्रेक कामगिरी

‘जो हिंदू हित की बात करेगा, वही देशपर राज करेगा’ अशी थेट आणि स्पष्ट गर्जना करणारे धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे पदर “धर्मवीर – २” या चित्रपटातून उलगडले आहे

“धर्मवीर २” चा बॉक्सऑफिसवर धमाका, पहिल्याच दिवशी रेकॉर्ड ब्रेक कामगिरी

‘जो हिंदू हित की बात करेगा, वही देशपर राज करेगा’ अशी थेट आणि स्पष्ट गर्जना करणारे धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे पदर “धर्मवीर – २” या चित्रपटातून उलगडले आहे. दिनांक २७ सप्टेंबरला “धर्मवीर – २” हा चित्रपट प्रदर्शित झाला. “धर्मवीर -२” या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओज आणि साहील मोशन आर्ट्स या निर्मिती संस्थेचे उमेश कुमार बन्सल आणि मंगेश देसाई यांनी केली आहे. तर लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनी निभावली आहे. प्रसाद ओक, क्षितीश दाते यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला “धर्मवीर २” हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून पहिल्या दिवशी या चित्रपटाने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करत तब्बल १ कोटी ९२ लाखांचा गल्ला कमावला असून २०२४ या वर्षात पहिल्या दिवशी सगळ्यात जास्त कमाई करणारा मराठी सिनेमा ठरला आहे. १५०० पेक्षा ही अधिक शोजने या चित्रपटाची सुरुवात करण्यात आली आहे.

चित्रपटाचा टीजर, ट्रेलरला मिळालेला तुफान प्रतिसाद श्रवणीय संगीत यामुळे तर चित्रपटाची चांगलीच हवा निर्माण झाली होती. रसिकांच्या मानत चित्रपटात नक्की काय दाखवणार याची उत्सुकता होती आणि त्याचेच प्रतिबिंब आपल्याला बॉक्स ऑफिसवर दिसून येत आहे. महिला वर्गाचा वाढता प्रतिसाद मिळत असून कुटुंबासोबत चित्रपट पाहण्यासाठी जात असल्याचे चित्र दिसते आहे. केवळ मुंबई, ठाणे नाहीतर संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपटला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये कलेक्शन मध्ये नक्कीच वाढ होईल यात शंका नाही. धर्मवीर २ या चित्रपटाची अजुन एक विशेष बाब म्हणजे, शिंदे साहेबांची अगदी हूबे हुब भूमिका अभिनेता क्षितीश दाते याने साकारली असून सिनेमाच्या शेवटच्या उत्कंठावर्धक काही मिनिटांमध्ये खऱ्या मुख्यमंत्र्यांच्या अभिनयाची झलक रसिकांना पहायला मिळत असून पडद्यावर मुख्यमंत्री साहेबांची एंट्री होताच रसिकांचा दमदार प्रतिसाद मिळत आहे. केवळ वन टेक मध्ये साहेबांनी तो सीन झाला असल्याचे निर्माते मंगेश देसाई यांनी आवर्जून नमूद केले.

हे ही वाचा:

इकोफ्रेंडली सुंदर माझा बाप्पा स्पर्धा २०२४

टाईम महाराष्ट्र आयोजित “इकोफ्रेंडली सुंदर माझा बाप्पा!” गणेशोत्सव स्पर्धा २०२४

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version