धर्मवीर -२ मध्ये स्वत: CM Eknath Shinde दिसणार ?

दरम्यान, या चित्रपटात धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनपटावर आधारित हा चित्रपट आता हिंदीत देखील दिसणार आहे. कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन अशी चौफेर भूमिका प्रविण तरडे यांनीच यावेळी निभावली असून महेश लिमये यांनी सिनेमॅटोग्राफीचं काम केलं आहे.त्यामुळे आता ‘धर्मवीर २’ मध्ये काय दाखवणार हे पाहणं औत्सुक्याचं असेल.

धर्मवीर -२ मध्ये स्वत: CM Eknath Shinde दिसणार ?

१३ मे २०२२ रोजी धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या जीवनपटावर आधारित “धर्मवीर.. मुक्काम पोस्ट ठाणे” हा चित्रपट प्रदर्शित झाला. दोन वर्षापूर्वी आलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घातला होता. धर्मवीर या सिनेमानंतर त्याचा पुढील भाग कधी येईल यांची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. ३० जून २०२४ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं सरकार स्थापन होऊन २ वर्ष पूर्ण झाली. या शुभ दिनाचं औचित्य साधून काल धर्मवीर-२ या चित्रपटाचं पोस्टर लॉंच करण्यात आलं.

धर्मवीर  (Dharmveer )या चित्रपटानंतर प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यांच्या प्रतिसादानंतर दुसरा भाग कधी येणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. पण आता निर्माते मंगेश देसाई(Mangesh desai ) यांनी ९ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या मुख्य भुमिकेत अभिनेते आणि दिग्दर्शक प्रसाद ओक हेच दिसणार आहेत. चित्रपटाच्या पहिल्या भागात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या भुमिकेत क्षितिज दाते यांनी भुमिका साकारली होती.

“धर्मवीर – २” या सिनेमातून पुनरावृत्ती करण्यात येणार आहे.पॉस्टर लॉचिंग दरम्यान, अभिनेते सचिन पिळगावकर(Sachin pilgaonkar), अभिनेते अशोक सराफ(Ashok Saraf), बॉलीवूड अभिनेते बॉबी देओल(Boby Deol), महेश कोठारे (mahesh kothare), महेश मांजरेकर (Mahesh manjrekar) हे उपस्थित होते. त्यावेळी अभिनेते सचिन पिळगावकर (Sachin pilgaonkar) यांनी एक वक्तव्य केलं आणि त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वत: सिनेसृष्टीत पदार्पण करणार अशा चर्चा सुरु झाल्या.

सुप्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर (Sachin pilgaonkar) यांनी,”तुम्ही मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन दोन वर्षे पूर्ण झाली.या चित्रपटात तुम्ही काम केल्याचं समजलं. तुमचं सिनेसृष्टीत स्वागत..”असं ते म्हणाले.आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे स्वत:चित्रपटसृष्टीत येणार की काय अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.

दरम्यान, या चित्रपटात धर्मवीर आनंद दिघे(Anand Dighe ) यांच्या जीवनपटावर आधारित हा चित्रपट आता हिंदीत देखील दिसणार आहे. कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन अशी चौफेर भूमिका प्रविण तरडे यांनीच यावेळी निभावली असून महेश लिमये यांनी सिनेमॅटोग्राफीचं काम केलं आहे.”हिंदुत्वाशी गद्दारी नाही”आशयाचं पोस्टर आहे. त्यामुळे आता ‘धर्मवीर २’ मध्ये काय दाखवणार हे पाहणं औत्सुक्याचं असेल.

हे ही वाचा:

MAHARASHTRA ASSEMBLY MONSOON SESSION 2024 : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेवर आमदार सत्यजित तांबे यांनी उठवला आवाज

MPCB ने केली वारकऱ्यांसाठी मोठी घोषणा ; आता इंद्रायणी प्रदूषण मुक्त होणार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version