spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राज्यातील पूरपरिस्थितीमुळे “धर्मवीर-२” चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलले; निर्मात्यांचा अनोखा निर्णय

संपूर्ण महाराष्ट्रात "धर्मवीर-२" च्या चित्रपटाच्या चर्चा चालू असतानाच एक मोठी बातमी समोर आली आहे. अभिनेता प्रसाद ओकची मुख्य भूमिका असलेल्या "धर्मवीर-२" या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात “धर्मवीर-२” च्या चित्रपटाच्या चर्चा चालू असतानाच एक मोठी बातमी समोर आली आहे. अभिनेता प्रसाद ओकची मुख्य भूमिका असलेल्या “धर्मवीर-२” या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. हा चित्रपट येत्या ९ ऑगस्ट रोजी जगभरात मराठी आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार होता. मात्र आता ह्या चित्रपटाची तारीख पुढे ढकलली आहे. राज्यात होत असलेली अतिवृष्टी, त्यामुळे ओढवलेल्या पूरपरिस्थितीमुळे चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. याविषयीची माहिती निर्माते मंगेश देसाई यांनी दिली आहे. “धर्मवीर-२” चित्रपटाचा टीजर, गाणी आणि ट्रेलरला सोशल मीडियातून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. प्रेक्षकांना आणखी काही दिवस या चित्रपटासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई म्हणाले, “की गेल्या काही दिवसांपासून अवघ्या महाराष्ट्रात पूर जन्य परिस्थिती निर्माण झाली आहेत, काही गाव पाण्याखाली गेली असून काही गावांचा संपर्कही तुटला आहे. राज्यात सुरु असलेली ही पूरपरिस्थिती पाहता “धर्मवीर-२” हा चित्रपट ९ ऑगस्टला प्रदर्शित करणे योग्य वाटत नाही. महाराष्ट्रातील जनतेच्या डोळ्यांत पाणी असताना, त्यांच्यासमोर असलेल्या अडचणी असताना त्याच काळात चित्रपट प्रदर्शित करण्यापेक्षा परिस्थितीचा आढावा घेऊन आम्ही चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करू असे सांगितले.”

आपल्या लोककारणी नेत्याला म्हणजेच आनंद दिघे साहेबांना “धर्मवीर” या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर बघायला प्रेक्षक आतुर होते. “धर्मवीर’ या चित्रपटाला प्रेक्षकांचं उत्तम प्रतिसादही मिळाला. हा चित्रपट बघून अनेकांच्या आठवणी पुन्हा नव्याने ताज्या झाल्या आणि भावुकही झाले. धर्मवीर २ च्या पोस्टरवर आनंद दिघे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट असा उल्लेख करण्यात आला आहे. धर्मवीर चित्रपटात दिघे साहेबांचं जीवनचरित्र दाखवल्यानंतर आता धर्मवीर २ मध्ये हिंदुत्वाची गोष्ट कशी दाखवली जाणार याकडे आता अनेकांचं लक्ष लागले आहे.

हे ही वाचा:

Pune Monsoon Updates: दुर्घटना टाळण्यासाठी स्वत:सह कुटुंबाची काळजी घ्या, Ajit Pawar यांचे नागरिकांना आवाहन

पूर परिस्थितीत प्रशासन मदतीसाठी फिल्डवर, बचाव कार्य सुरू CM Shinde यांची माहिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss