Dharmveer 2 trailer launch : धर्मवीर ट्रेलर लॉन्चवेळी क्षितिज दाते म्हणाला, प्रवीण तरडे यांच्यावर सरस्वती प्रसन्न…

Dharmveer 2 trailer launch : धर्मवीर ट्रेलर लॉन्चवेळी क्षितिज दाते म्हणाला, प्रवीण तरडे यांच्यावर सरस्वती प्रसन्न…

चित्रपटाच्या घोषणेपासूनच उत्सुकता निर्माण केलेल्या “धर्मवीर – २” चित्रपटाचा दमदार ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सुप्रसिद्ध बॉलीवुडस्टार सलमान खान, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, सचिन पिळगांवकर हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक मातब्बर कलाकारांची मांदियाळी त्याच बरोबर सर्व नेतेमंडळी देखील या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते.

यावेळी बोलत असतना क्षितिज दाते म्हणाला आहे की, सगळ्यांनाच आपलं म्हणणं मांडायला आवडतं तसं तर मलाही आवडतं पण कुठे आणि किती बोलावं याचा भान जपणारा मी माणूस आहे. सर्व कलाकारांमध्ये मी वयाने अनुभवानी सगळ्यात लहान आहे याची मला जाणीव आहे. त्यामुळे त्या हिशोबानेच बोलतो प्रवीण तरडे यांच्याबरोबर मी केलेला हा चौथा पाचवा सिनेमा आहे आणि हे केवळ मला माझं भाग्यवंत की मला त्यांच्याबरोबर काम करायची संधी मिळते. याचा कारण आम्ही कायमच हे म्हणतो की, प्रवीण तरडे सरांवर सरस्वती प्रसन्न आहे इतकं सुंदर लिखाण आणि दिग्दर्शक कायम करत असतात आणि खरोखर प्रेक्षकाभिमुख कलाकृती कशी करावी याची त्याला त्यांना पुरेपूर जाण आहे धर्मवीर पार्ट वन हा सिनेमा प्रेक्षकांनी खूप डोक्यावर घेतला आजही लोक भेटतात तेव्हा एक एकाच सीन च वर्णन करून एकदा मोमेंट बद्दल बोलतात आणि कलाकार मित्रांनी या अशा गोष्टींबद्दल बोलणं हे समजून घेण्यासारखं असतं पण प्रेक्षक जेव्हा अभिनयातले बारकावे सीन मधले बारकावे कॉन्टॅक्ट त्याविषयी बोलतात तेव्हा खरोखर त्यांनी किती बारकाईने सिनेमा लक्ष देऊन पाहिलाय त्याची जाणीव होते. तितकाच किंवा किंबहुना त्यातून खूप जास्त भक्कम आणि जोरदार असा धर्मवीर भाग दोन सरांनी केलेला आहे असं क्षितिज यावेळी म्हणाला आहे.

पुढे क्षितिज म्हणाला आहे की, मोठी मोठी आणि महत्त्वाची कलाकृती ही अशी पटापट होत नाही त्यामुळे गेले कित्येक महिने आम्ही या सिनेमाच्या प्रक्रियेत आहोत चित्रीकरण असेल डबिंग असेल आता तर हिंदी भाषेत आहे त्यामुळे हिंदीतही आम्ही डबिंग करतो आहोत तर मला असं वाटतं की या सिनेमाच्या निमित्ताने चरित्रात्मक सिनेमांमध्ये ती जादू खूप अनुभवायला मिळते की आपण आयुष्यात फोटोज मध्ये पाहिलेली व्यक्ती किंवा समोरासमोर पाहिले मी व्यक्ती हे कुठल्यातरी नट साकारत असतो आणि आपण येथे जमलेले बहुतांश मंडळी हे कलाकार आहोत तर आपल्याला हे ठाऊक आहे की कुठली व्यक्ती किती कॉस्ट्यूम मेकअप करून आपल्या समोर आली तरीसुद्धा आपण ओके असतो पण प्रसाद दादा प्रसाद ओक जेव्हा पहिल्यांदा माझ्यासमोर पार्ट वन च्या वेळेला धर्मवीर दिघे साहेबांच्या वेशात मेकअप मध्ये आला तो क्षण मी कधीही विसरू शकणार नाही हा जन्म लक्षात राहतो माझ्या कारण वरिष्ठ काहींना पण मित्र असून सुद्धा मी त्याच्याशी पुढच्या इतकी जादू माझ्यावर इफेक्ट झालेली होती तर मला असं वाटतं की प्रसाद ओक बरोबर काम करणे आणि सिनेमातल्या इतर अनेक नटांबरोबर काम करणे भाग्यच आहे असं यावेळी क्षितिज दाते म्हणाला आहे.

हे ही वाचा:

मुंबईसह उपनगरात पावसाची जोरदार बॅटिंग, नागरिकांचे प्रचंड हाल

निवडणुकीच्या तोंडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने नकली वाघनखांचे प्रदर्शन: Nana Patole

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version