Wednesday, September 4, 2024

Latest Posts

उत्तर प्रदेशमध्ये एक्स्प्रेसचा भीषण अपघात, रेल्वेचे १०- १२ डब्बे रुळावरुन घसरले! दोघांचा मृत्यू तर…

उत्तर प्रदेशातील गोंडा येथे गुरुवारी दुपारी एक मोठा रेल्वे अपघात झाला. येथे चंदीगडहून गोरखपूरमार्गे आसामला जाणाऱ्या दिब्रुगड एक्स्प्रेसचे 10 डबे रुळावरून घसरले.

Dibrugarh Express Train Derail : उत्तर प्रदेशातील गोंडा येथे गुरुवारी दुपारी एक मोठा रेल्वे अपघात झाला. येथे चंदीगडहून गोरखपूरमार्गे आसामला जाणाऱ्या दिब्रुगड एक्स्प्रेसचे 10 डबे रुळावरून घसरले. या अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे. गोरखपूर रेल्वे विभागाच्या मोतीगंज सीमेवर ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे. खराब झालेल्या डब्यांमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात येत आहे. अपघाताबाबत रेल्वेने हेल्पलाइन क्रमांकही जारी केले आहेत.

हेल्पलाइन क्रमांक:

LJN-8957409292
GD- 8957400965

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना अपघातस्थळी पोहोचण्याच्या सूचना दिल्या आहेत. भारतीय रेल्वेने ही माहिती दिली. चंदीगड-दिब्रूगड एक्स्प्रेस उत्तर प्रदेशातील गोंडाजवळ दुपारी २:३५ च्या सुमारास रुळावरून घसरली. त्याचवेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रेल्वे अपघाताची माहिती घेतली आणि अधिकाऱ्यांना अपघातस्थळी पोहोचण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान, रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. प्राथमिक माहितीनुसार अनेक डबे रुळावरून घसरले आहेत. गोंडाजवळ एक्सप्रेस रुळावरून घसरली आहे. या अपघातात अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. गोंडा येथे चंदीगड-दिब्रुगड एक्स्प्रेस क्रमांक १५९०४ चे काही डबे पलटल्याचे सांगण्यात येत आहे. गोंडा-झिलाही दरम्यान पिकौराजवळ हा अपघात झाला. अजून किती लोक जखमी झाले आहेत याची माहिती नाही. प्रशासनाने गोंडा येथून बचाव पथक पाठवले आहे. या अपघातात चार एसी डब्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

दिब्रुगड-चंदीगड एक्स्प्रेस रुळावरून घसरल्याच्या घटनेबाबत ईशान्य रेल्वेचे सीपीआरओ पंकज सिंह म्हणाले, “रेल्वेची मेडिकल व्हॅन घटनास्थळी पोहोचली असून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आले आहेत. ही घटना दुपारी घडली.” हा प्रकार दुपारी २.३७ च्या सुमारास घडला, प्राथमिक माहितीनुसार ४-५ डबे रुळावरून घसरले आहेत.

हे ही वाचा:

ASHADHI EKADASHI 2024 : CM EKNATH SHINDE यांनी आषाढी एकादशी निमित्त मागितले विठुरायाकडे साकडे

CM EKNATH SINDE यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात शासकीय महापूजा संपन्न; १०३ कोटी रुपये निधीची केली घोषणा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss