दिग्पाल लांजेकरांनी शेअर केला ‘रेशीमबाग’ इथला अनुभव…

एका पोस्टद्वारे नागपूर संघाचे मुख्यालय असलेल्या रेशीमबाग येतील अनुभव शेअर केला आहे.

दिग्पाल लांजेकरांनी शेअर केला ‘रेशीमबाग’ इथला अनुभव…

रेशीमबाग

शिवराज अष्टक सिनेमांमधून शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील विविध पैलू लोकांसमोर मांडणारे दिग्दर्शक म्हणजे दिग्पाल लांजेकर. त्यांच्या शिवराज अष्टकांपैकी आतापर्यंत पावनखिंड, फर्जंद, फत्तेशिकस्त आणि शेर शिवराय हे चार सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. या सर्व सिनेमांना प्रेक्षकांचा देखील भरभरून प्रतिसाद मिळत आहे. शिवराज अष्टकांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व नवीन पिढीपर्यंत पोहोचवणं हे दिग्पाल लांजेकर यांचे उद्दिष्ट आहे.

सिनेमांबरोबर दिग्पाल लांजेकर हे आपल्या सोशल मीडियावर देखील सक्रिय असतात. सोशल मीडियातून आपल्या नवीन प्रोजेक्टबद्दल माहिती तर ते देतच असतात पण, तसेच काही राजकीय व सामाजिक गोष्टींवरही सोशल मीडियाच्या माध्यमातून ते आपली मतं मांडत असतात. तर हल्लीच दिग्पाल लांजेकर यांनी एका पोस्टद्वारे नागपूर संघाचे मुख्यालय असलेल्या रेशीमबाग येतील अनुभव शेअर केला आहे.

सदर पोस्टमध्ये रेशीमबागला भेट दिल्यावर त्यांच्या मनात नक्की काय भावना निर्माण झाल्या हे त्यांनी मांडले आहे. तसेच मोहन भागवत यांनी रेशीमबाग येथे पावनखिंड आणि शेर शिवराज हे त्यांचे दोन्ही चित्रपट पाहण्याची इच्छा व्यक्त केल्यावर दिग्पाल लांजेकरांना नक्की काय वाटले? त्यांच्या मनात कसा विविध भावनांचा कल्लोळ माजला होता हे सर्वच त्यांनी एका पोस्टाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केलं.

Exit mobile version