Wednesday, July 3, 2024

Latest Posts

तुम्हाला देखील अनंत अंबानी – राधिका मर्चंट यांच्या लग्नपत्रिकेसारखी लग्नपत्रिका बनवायची का ? जाणून घ्या सविस्तर

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी लवकरच लग्न करणार आहे .

Anant Ambani Wedding Invitation Card : मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी लवकरच लग्न करणार आहे . दोघांनी आयोजित केलेल्या दोन प्री-वेडिंग पार्टींमुळे हे लग्न खूप जास्त चर्चेत आहे . दरम्यान, आता त्यांच्या लग्नाची तारीख निश्चित झाली आहे . १२ जुलै रोजी दोघेही लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. अशात या दोघांच्या लग्नपत्रिकेची जोरदार चर्चा रंगत आहे. अंबानी कुटुंबाच्या प्रत्येक समारंभाप्रमाणेच त्यांच्या घरी लावलेली लग्नपत्रिकाही एक मोठी लक्झरी असते . ज्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे . अशा परिस्थितीत, जर तुम्हालाही असेच कार्ड बनवायचे असेल, तर तुम्हाला त्यासाठी किती पैसे द्यावे लागतील ?

अनंत – राधिकाच्या लग्नाची पत्रिका खूप छान आहे. त्यांच्या लग्नपत्रिकेचे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. हे निमंत्रण पत्र बॉक्सच्या स्वरूपात आहे. बॉक्स उघडल्यावर आपल्याला एका प्राचीन मंदिराची प्रतिकृती दिसते. सर्व प्रथम या कार्डमध्ये दोन दरवाजे आहेत. जे उघडल्यावर कार्डच्या आत प्रवेश मिळेल. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या आयुष्यातील नव्या सुरुवातीची खूण म्हणून तो दरवाजा सादर करण्यात आला आहे . हे कार्ड खूपच आकर्षक दिसते . ज्यामध्ये दार उघडताच समोर दिसणारे एक चांदीचे मंदिर दिसते , ज्यामध्ये सोन्याच्या मूर्ती आहेत . या निमंत्रण पत्रिकेत भगवान गणेश , भगवान विष्णू , लक्ष्मी , राधा – कृष्ण , दुर्गा इत्यादी देव – देवतांची चित्रे आहेत . लग्नपत्रिकेसोबतच सर्व पाहुण्यांना उद्देशून नीता अंबानी यांचे एक पत्र देखील आहे , जे हस्तलिखित आहे . त्या पत्रात नीता अंबानी आपल्या भावना व्यक्त करत आहेत आणि सर्व पाहुण्यांना या शुभ सोहळ्याला येण्याची विनंती करत आहेत . या कार्डची किंमत जाहीर करण्यात आलेली नाही . मात्र, कार्ड पाहता त्यात वापरलेल्या सोन्यामुळे त्याची किंमत लाखात असल्याचा अंदाज आहे . अशा परिस्थितीत तुम्हालाही असे कार्ड बनवायचे असेल, तर तुम्हाला लाखो रुपये खर्च करावे लागतील .

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट या महिन्यात लग्न करणार आहेत . १२ जुलै ही लग्नाची शुभ तारीख निश्चित करण्यात आली आहे . मात्र, त्यानंतरही लग्नाशी संबंधित समारंभ सुरूच राहणार आहेत . विवाहानंतर १३ जुलै रोजी शुभ आशीर्वाद तर १४ जुलै रोजी मंगल उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . बॉक्समध्ये प्रत्येक फंक्शनसाठी वेगवेगळी कार्डे निमंत्रण पत्रिकेसोबत दिली आहेत . जे खूपच आकर्षक दिसते .

हे ही वाचा:

‘तुमच्या खुर्चीवर दोन लोक बसलेत…’ Rahul Gandhi यांची लोकसभा अध्यक्ष Om Birla यांच्यावर टीका

राहुल गांधींनी संसदेत भगवान शिवाचा फोटो का दाखवला?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss