spot_img
Sunday, September 22, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याची मुलगी करते ड्रग्जचे सेवन?

बॉलिवूडच्या दिग्गज व जेष्ठ अभिनेते कमल हासन यांची मुलगी देखील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. कमल हासन यांच्या मुलीचे नाव श्रुती हासन आहे.

बॉलिवूडच्या दिग्गज व जेष्ठ अभिनेते कमल हासन यांची मुलगी देखील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. कमल हासन यांच्या मुलीचे नाव श्रुती हासन आहे. श्रुतीने देखील अनेक चित्रपटांमध्ये काम करून आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. श्रुतीने अनेक उत्तमोत्तम भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. सध्या सोशल मीडियावर कलाकार मंडळी मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. कमल हासन यांची मुलगी श्रुती हासन देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह (Active) असते. कमल हासन याचप्रमाणे श्रुतीचे देखील अनेक चाहते आहेत. सोशल मीडियावर देखील श्रुतीचे फॅन फॉलोविंग (Fan Following) प्रचंड आहे. सोशल मीडियावर अनेक कलाकारांना ट्रोलिंग (Trolling) चा सामना करावा लागतो. श्रुतीला देखील विविध कारणांमुळे सोशल मीडियावर ट्रोल केले जाते. मात्र श्रुती कधीही टीकेला जोमानत नसून अनेकदा टीकाकारांना सडेतोड उत्तर देते. आतापर्यंत श्रुतीने अनेकांची तोंडे बंद केली आहेत. सध्या श्रुती अश्याच एक गोष्टीमुळे चर्चेत आली आहे. नुकतीच श्रुती ट्रोलिंगला बळी पडली असून तिने एका चाहत्याला सडेतोड उत्तर देत त्याचे तोंड बंद केले आहे. श्रुतीने एका प्रश्नोत्तराच्या सेशनद्वारे चाहत्यांशी संवाद साधला होता त्यावेळी एका चाहत्याने श्रुतीला प्रश्न विचारला. तो चाहत्याने श्रुतीला प्रश्न विचारात म्हणाला, “तू ड्रग्ज घेतेस का” या प्रश्नाला श्रुतीने उत्तर दिलं आहे.

त्या चाहत्याला उत्तर देत म्हणाली, “नाही, मी पॉट स्मोक करत नाही. मी दारुसुद्धा पीत नाही. मी संयमित आयुष्य जगते आणि त्यासाठी मी खूप कृतज्ञ आहे” या श्रुतीच्या उत्तराने अनेकांची मने जिंकली आहे. सर्वत्र श्रुतीचे कौतुक होत आहे. तसेच श्रुतीने २०१९ साली तिला दारूचं व्यसन असल्याचे गुपित उघड केले होते. दारूचे व्यसन असल्यामुळे श्रुतीला आरोग्याच्या निगडित काही समस्या निर्माण झाल्या होत्या. म्हणूनच श्रुतीने हळूहळू दारूपासून स्वतःची सुटका केली. मागील काही वर्षात श्रुतीच्या मानसिक आरोग्यदेखील ठीक नसल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी श्रुती उपचार घेत होती यासाठी तिला एका चित्रपटाच्या कार्यक्रमासाठी मुकावे लागले अश्या चारच्या सर्वत्र होत्या. त्यावर श्रुतीने ट्रोलर्सला चांगलच सुनावलं होत. याबाबत श्रुती म्हणाली, “अशा पद्धतीची चुकीची माहिती पसरवणे, अशा विषयांना अत्यंत नाट्यमय पद्धतीने हाताळणे यांमुळेच लोक मानसिक आरोग्याविषयी मोकळेपणे बोलण्यास घाबरतात. पण या सर्वांचा माझ्यावर काही परिणाम होणार नाही. मी नेहमीच मानसिक आरोग्याविषयी बेधडकपणे बोलत राहीन. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या स्वत:ची काळजी घेण्याला मी प्राधान्य देत राहीन. मला फक्त ताप होता, पण तुम्ही थेरेपीस्टकडे जाऊन उपचार घेण्याची गरज आहे”

श्रुतीने बॉलिवूडसह दाक्षिणात्य सिनेमात देखील अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. श्रुती सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. लवकरच श्रुतीचा आगामी चित्रपट सालार हा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सध्या या चित्रपटाचे शूटिंग सुरु आहे. श्रुती सोबत या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत प्रभास देखील प्रेक्षकांना दिसणार आहे. याचित्रपटाचे दिग्दर्शन हे प्रशांत नील यांनी केले आहे.

हे ही वाचा:

नाना पटोले यांची मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे मागणी, म्हणाले…

मुंबईमध्ये ईडीचे १५ ठिकाणी छापे, संजय राऊत यांच्या मित्रावर गुन्हा दाखल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss