spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘घे डबल’चा डब्ब्ल धम्माल टीझर रिलीज

येत्या ३० सप्टेंबरपासून सर्वत्र डब्बल कॉमेडीची हवा होणार आहे. म्हणजेच अभिनेते भाऊ कदम (Bhau Kadam) आणि भूषण पाटील (Bhushan Patil) यांची दुहेरी भूमिका असणाऱ्या ‘घे डबल’ या चित्रपटाचं टीझर हा सर्वांच्या भेटीस आला आहे.

येत्या ३० सप्टेंबरपासून सर्वत्र डब्बल कॉमेडीची हवा होणार आहे. म्हणजेच अभिनेते भाऊ कदम (Bhau Kadam) आणि भूषण पाटील (Bhushan Patil) यांची दुहेरी भूमिका असणाऱ्या ‘घे डबल’ या चित्रपटाचं टीझर हा सर्वांच्या भेटीस आला आहे. जिओ स्टुडिओज व फाईन क्राफ्ट निर्मित ‘घे डबल’ चित्रपटाचे भन्नाट टीझर पोस्टर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलं. पोस्टरवरील भाऊ आणि भूषण यांच्या डबल रोलविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. आज याच चित्रपटाचा टीझर सगळ्यांच्या भेटीला आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhau Kadam (@bhaukadamofficial)

चित्रपटाचे दिग्दर्शक विश्वास जोशी म्हणतात, “जिओ स्टुडिओज वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्यातच ‘घे डबल’ हा विनोदी चित्रपट ते सादर करत आहेत. हा एक निखळ मनोरंजन करणारा कौटुंबिक चित्रपट असून यात भाऊ कदम आणि भूषण पाटील हे दोघं विनोदवीर धुमाकूळ घालणार आहेत. त्यासोबतच, उत्तम कलाकारांची फळी असणार हा चित्रपट प्रेक्षकांचे डबल मनोरंजन नक्की करणार !”

विश्वास जोशी यांनी ‘घे डबल’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, ज्योती देशपांडे आणि जिओ स्टुडिओज चित्रपटाचे निर्माते आहेत. येत्या ३० सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमधून आपल्या खळखळून हसवण्यासाठी सज्ज असणाऱ्या या चित्रपटात कॉमेडी किंग भाऊ कदम आणि अभिनेता भूषण पाटील बरोबरच छाया कदम, भारत गणेशपुरे, किशोर कदम, ओमकार भोजने, विद्याधर जोशी आणि संस्कृती बालगुडे अशी तगडी स्टारकास्टही पाहायला मिळणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhau Kadam (@bhaukadamofficial)

‘घे डबल’ या सिनेमाचे टीझर पोस्टर भाऊ कदमने सोशल मीडियावर शेअर केले होता. पोस्टर शेअर करत त्याने लिहिलं, धम्माल एंटरटेनमेंटचा डब्बल बार, सर्व टेंशनवर करणार डब्बल वार! तुम्हाला खळखळून हसवायला घेऊन येत आहोत भाऊ कदमच्या कॉमेडीचा डब्बल धमाका…’घे डबल’ ३० सप्टेंबरपासून सर्व चित्रपटगृहांत”. ‘घे डबल’ या सिनेमाचे टीझर पोस्टर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले असून प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

 

हे ही वाचा:

यश, परी आणि नेहा घेणार का प्रेक्षकांचा निरोप ?

‘या’ निर्मात्याच्या सल्ल्याने साइन केला चित्रपट, अनन्या पांडेचा खुलासा

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss