spot_img
Tuesday, September 24, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Double XL Trailer: हुमा आणि सोनाक्षीच्या ‘डबल एक्‍सएल’ चित्रपटामध्ये ‘हा’ खेळाडू साकारणार भूमिका

खरंतर हुमा कुरैशी (Huma Qureshi) आणि सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) यांचे कौतूक करायला हवे की, त्यांनी डबल एक्स एल (Double XL) नावाचा चित्रपट करण्याची तयारी दर्शवली. जेव्हा या चित्रपटाचा टीझर व्हायरल झाला होता त्यावेळी त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

Double XL Teaser: खरंतर हुमा कुरैशी (Huma Qureshi) आणि सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) यांचे कौतूक करायला हवे की, त्यांनी डबल एक्स एल (Double XL) नावाचा चित्रपट करण्याची तयारी दर्शवली. जेव्हा या चित्रपटाचा टीझर व्हायरल झाला होता त्यावेळी त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. बॉलीवूडच्या दोन्ही स्टार अभिनेत्री या चित्रपटामध्ये आपल्या वेगळ्या भूमिकेनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेणार आहेत. आज या चित्रपटाचा ट्रेलर व्हायरल झाला आहे. या ट्रेलरमध्ये दिसत आहे की वाढलेलं वजनामुळे हुमा आणि सोनाक्षी यांना आयुष्यात येणाऱ्या अडचणी दाखवण्यात आल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Huma Qureshi (@iamhumaq)

 ट्रेलरच्या सुरुवातीला दिसत आहे की हुमा ही एका पार्टीमध्ये क्रिकेटर शिखर धवनसोबत डान्स करत आहे. हुमानं या चित्रपटात राजश्री त्रिवेदी ही भूमिका साकारली आहे. ट्रेलरमध्ये दिसते की अचानक राजश्रीची आई तिला झोपेतून उठते. त्यानंतर राजश्रीसोबतच सोनाक्षीच्या आयुष्याबाबत देखील ट्रेलरमध्ये दाखवण्यात आली आहे. सोनाक्षीनं या चित्रपटात सायरा खन्ना ही भूमिका साकारली आहे. सायराचा बॉयफ्रेंड हा तिच्या वजनामुळे तिला धोका देतो. या सगळ्यामध्ये सायरा आणि राजश्री यांची मैत्री होते आणि मग दोघी वाढलेल्या वजनाबाबत चर्चा करतात. त्या दोघींची मैत्री देखील ट्रेलरमध्ये दिसते. या चित्रपटामधून शिखर धवन बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सोनाक्षी सिन्हा, शिखर धवन आणि हुमा कुरेशी यांच्यासोबतच जहीर इकबाल आणि तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता महत राघवेंद्र हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत. महत राघवेंद्र हा या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

डबल एक्स एल हा प्रभावीपणे बॉडी शेमिंगसारख्या विषयावर भाष्य करणारा असेल असे त्या ट्रेलरमध्ये दिसून आले आहे. ट्रेलरमध्ये दोन जास्त वजनाच्या युवती आहेत. त्यांना काही करुन आपआपल्या क्षेत्रात मोठं यश संपादन करायचे आहे. मात्र त्यांचे वाढणारे वजन आणि त्यावरुन त्यांच्यावर होणारी टीका याचा परिणाम त्यांच्यावर होतो आहे. यावेळी त्यांनी घेतलेला निर्णय, पुरुषीपणावर केलेली टीका, आजच्या युवकांना काय हवे आहे, त्यांची मानसिकता यावर प्रभावीपणे डबल एक्स एल भाष्य़ करताना दिसतो आहे.

सतराम रमणी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तर भूषण कुमार, कृष्ण कुमार, विपुल डी शाह, राजेश बहल आणि अश्विन वर्दे, साकिब सलीम, हुमा कुरेशी आणि मुदस्सर अजीज यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट ४ नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज पाहिल्यानंतर आता हुमा आणि सोनाक्षी यांचे चाहते या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.

हे ही वाचा :

बॉलीवूड सिंगर बादशाह गुपचूप करत आहे या अभिनेत्रीला डेट, वर्षभरानंतर झाला खुलासा

Diwali 2022 : अगदी सोप्या पद्धतीत तुम्हला जमतील अशा खास मेहंदी डिझाइन्स

Bigg Boss Marathi 4 : बिग बॉसच्या घरात गटबाजीला सुरुवात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss