spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

लवकरच प्रदर्शित होणार “दृश्यम 2”

अजय देवगण ने एक फोटो शेअर केला होता. ‘विजय पुन्हा एकदा त्याच्या कुटुंबाचं रक्षण करू शकेल का?’, असं कॅप्शन देत अजयने फोटो शेअर केला होता. 

2015 साली प्रदर्शित झालेला अजय देवगण, तब्बू, श्रिया सरन यांचा ‘दृश्यम’ हा सिनेमा चांगलाच गाजला होता. आता तब्बल 7 वर्षानंतर या चित्रपटाचा सीक्वल तुमच्या आमच्या भेटीस येतोय. ‘दृश्यम 2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चौथी नापास असलेला विजय आणि त्याच्या कुटुंबाची कथा चाहत्यांना प्रचंड भावली होती. एका हत्या प्रकरणामुळे विजयचं कुटुंब अडचणीत येतं. विजय अतिशय शिताफीनं त्याच्या कुटुंबाला या प्रकरणातून वाचवतो. शेवटपर्यंत खिळवून ठेवणाऱ्या या चित्रपटानं चाहत्यांना वेड लावलं होतं.
याचा सीक्वल येणार प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. चाहते या थ्रिलर ड्रामाच्या सीक्वलची आतुरतेने वाट पाहत असताना, अजय देवगण ने दृश्यम 2 येणार असल्याची बातमी सोशल मीडियावर दिली आहे. हा चित्रपट 18 नोव्हेंबर 2022 रोजी चित्रपटगृहात बघायला मिळणार आहे. या आधी अजय देवगण ने एक फोटो शेअर केला होता. ‘विजय पुन्हा एकदा त्याच्या कुटुंबाचं रक्षण करू शकेल का?’, असं कॅप्शन देत अजयने फोटो शेअर केला होता.
अजय देवगण यांनी पोस्टर शेअर केला आणि हा पोस्टर पाहून चाहते हा चित्रपट बघायला उत्सुक झाले आहेत. अनेक चाहत्यांनी अजय देवगण आणि दृश्यम 2 च्या संपूर्ण टीम ला शुभेच्छा दिल्या आहेत. दृश्यम 2’मध्ये अजय विजयची भूमिका साकारणार असून श्रिया त्याची पत्नी नंदिनीची भूमिका साकारणार आहे. तब्बूही या चित्रपटात आहे. तर आता याची कथा कशी असेल आणि हा चित्रपट दृश्यम सारखा चर्चेत ठरेल का हे लवकरच कळेल.

Latest Posts

Don't Miss