Drishyam 2 : प्रेक्षकांना खास दिवाळी भेट; ‘दृश्यम 2’ वर निर्मात्यांनी दिली बंपर ऑफर

दृश्यम' च्या सुपर यशानंतर, अजय देवगण 'दृश्यम 2' चित्रपटाचा दुसरा भाग घेऊन हजर आहे. तब्बल 7 वर्षांनंतर विजय साळगावकरचे प्रकरण पुन्हा उघडणार, ज्याचे सत्य जाणून घेण्यासाठी अक्षय खन्ना तळापर्यंत जाऊन तपास करताना दिसणार आहे.

Drishyam 2 : प्रेक्षकांना खास दिवाळी भेट; ‘दृश्यम 2’ वर निर्मात्यांनी दिली बंपर ऑफर

दृश्यम’ च्या सुपर यशानंतर, अजय देवगण ‘दृश्यम 2’ चित्रपटाचा दुसरा भाग घेऊन हजर आहे. तब्बल ७ वर्षांनंतर विजय साळगावकरचे प्रकरण पुन्हा उघडणार, ज्याचे सत्य जाणून घेण्यासाठी अक्षय खन्ना तळापर्यंत जाऊन तपास करताना दिसणार आहे. तब्बू, श्रिया सरन आणि इशिता दत्ता देखील पडद्यावर दिसणार आहेत. मैं कसने या चित्रपटाचा ट्रेलर यापूर्वीच प्रदर्शित झाला असून, या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आता या चित्रपटाबाबत आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

सध्या देशभरात दिवाळी जोरात सुरू आहे. तर दुसरीकडे या चित्रपटाबद्दल लोकांमध्ये विशेष उत्साह आहे. अशा परिस्थितीत, निर्मात्यांनी प्रेक्षकांना एक खास ऑफर दिली आहे. २ ऑक्टोबर रोजी या चित्रपटाच्या तिकिटांच्या बुकिंगवर ५० टक्के सूट देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. फिल्म ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ही माहिती दिली. २ ऑक्टोबरशी संबंधित एक महत्त्वाची गोष्ट चित्रपटात दाखवली जाणार आहे. या चित्रपटाच्या कथेबाबत सोशल मीडियावर सतत चर्चा रंगत असतात.

हे ही वाचा:

Whats App : दोन तासानंतर व्हॉट्सअॅप सेवा पूर्ववत

Ram Setu Twitter Review : राम सेतू चित्रपट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी दिल्या रिअँक्शन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version