spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Drishyam 2 : ‘दृश्यम-2’ चा बॉक्स ऑफिसवर धमाक

दृश्यम (Drishyam) या चित्रपटाच्या पहिल्या भागाप्रमाणेच दुसऱ्या भागाला (Drishyam 2) देखील प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. बॉलिवूडचा सिंघम अजय देवगणच्या (Ajay Devgn) दृश्यम-2 (Drishyam 2) या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.

दृश्यम (Drishyam) या चित्रपटाच्या पहिल्या भागाप्रमाणेच दुसऱ्या भागाला (Drishyam 2) देखील प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. बॉलिवूडचा सिंघम अजय देवगणच्या (Ajay Devgn) दृश्यम-2 (Drishyam 2) या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. हा चित्रपट १८ नोव्हेंबर रोजी रिलीज झाला. चित्रपट रिलीज होऊन ६ दिवस झाले आहेत, तरी या चित्रपटाची जादू बॉक्स ऑफिसवर दिसत आहे. अभिषेक पाठक यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

‘दृश्यम 2’ हा ‘दृश्यम’ या प्रीक्वल चित्रपटाच्या कथेचा एक भाग आहे. विजय साळगावकर यांच्या हसऱ्या कुटुंबाची, आयजीच्या मुलाची हत्या आणि कुटुंबाला शिक्षेपासून वाचवण्याची ही कथा आहे. २०१५ च्या ‘दृश्यम’मध्ये आयजी मीरा यांच्या मुलाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना पाहिले. ज्याचा मृत्यू झाला असेल त्याने घटनेच्या काही तास आधी विजयच्या मुलीला अंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवला. त्यानंतर २ ऑक्टोबरच्या रात्री ब्लॅकमेल करण्यासाठी त्याच्या घराच्या आऊटहाऊसवर भेटण्यासाठी फोन केला. मुलीने संपूर्ण गोष्ट आईला सांगितली आणि दोघींनी तिच्याकडून व्हिडिओ हटवण्याविषयी सांगितले. पण मुलगा आता मुलीला सोडून आईच्या इज्जतीवर हात ठेवतो, कोणाला वाचवण्यासाठी मुलगी त्याला काठीने मारते. या प्रकरणात विजयच्या कुटुंबीयांचे नाव आल्यावर पोलिस त्यांच्याकडे चौकशी सुरू करतात. दुसऱ्या भागात विजय आणि त्याच्या कुटुंबाला गुन्हेगारीपासून मुक्ती मिळते की नाही हे दाखवले गेले आहे.

दृश्यम-2 या चित्रपटाची निर्मिती ५० कोटींच्या बजेटमध्ये करण्यात आली आहे. दृश्यम 2 हा भारतात ३३०२ स्क्रीन्सवर आणि ओव्हरसीजमध्ये ८५८ स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे. म्हणजेच हा सिनेमा एकूण ४ हजाराहून अधिक स्क्रीन्सवर रिलीज झाला. ‘दृश्यम 2’ या मल्याळम सिनेमाचा हा हिंदी रिमेक आहे. अजयच्या २०१५ मध्ये रिलीज झालेल्या दृश्यम या चित्रपटाला देखील प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. या चित्रपटाच्या पहिल्या भागाचे दिग्दर्शन दिवंगत दिग्दर्शक निशिकांत कामत यांनी केले होते.

‘दृश्यम 2’ हा सिनेमा सध्या सिनेमागृहात गाजत आहे. आता या सिनेमाचे डिजिटल राइट्स अॅमेझॉन प्राइम व्हिडीओने विकत घेतले आहेत. त्यामुळे आता प्राइम व्हिडीओवर प्रेक्षकांना हा सिनेमा घरबसल्या पाहता येणार आहे. डिसेंबरच्या शेवटी किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रेक्षक हा सिनेमा ओटीटीवर प्रेक्षकांना बघता येणार आहे, असं म्हटलं जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

 ‘दृश्यम 2’चे ओपनिंग डे कलेक्शन १५.३८ कोटी रुपये होते. तर या चित्रपटानं दुसऱ्या दिवशीही चांगली कमाई केली. या चित्रपटानं २१.५९ कोटींची कमाई दुसऱ्या दिवशी केली. तसेच दृश्यम-2 नं तिसऱ्या दिवशी २७.१७ कोटींची कमाई केली तर चौथ्या दिवशीही चित्रपट चांगले कलेक्शन करण्यात यशस्वी ठरलाय चौथ्या दिवशी या चित्रपटानं ११.८७ कोटी रुपयांची कमाई केली. ‘दृश्यम 2’ ने ५ व्या दिवशी १०.४८ कोटी रुपयांची कमाई केली. बुधवारी (२३ नोव्हेंबर) या चित्रपटानं १० कोटी कमावले. आता या चित्रपटाची एकूण कमाई ९६.४९ कोटी एवढी झाली आहे.

हे ही वाचा:

तुपकरांच्या अरबी समुद्रात होणाऱ्या जलसमाधी आंदोलनला तूर्तास स्थगित

कर्नाटकचे मुख्यमंत्री सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे नाहीत; देवेंद्र फडणवीस

Indian Science Congress : नागपुरात ४९ वर्षांनंतर प्रथमच भारतीय विज्ञान परिषदेचे आयोजन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss