Drishyam 2 Trailer : ‘मी विजय साळगावकर खरं सांगतो की…’; ‘दृश्यम 2’चा ट्रेलर रिलीज

ज्या अभिनेत्याच्या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत आहेत त्या दृष्यम २ चा ट्रेलर (Drishyam 2 Trailer) आज प्रदर्शित झाला आहे.

Drishyam 2 Trailer : ‘मी विजय साळगावकर खरं सांगतो की…’; ‘दृश्यम 2’चा ट्रेलर रिलीज

ज्या अभिनेत्याच्या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत आहेत त्या दृष्यम २ चा ट्रेलर (Drishyam 2 Trailer) आज प्रदर्शित झाला आहे. त्याला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी दृष्यमची चर्चा होती. त्याच्या टीझरचं प्रेक्षकांनी कौतूक केलं होतं.

‘दृश्यम 2’मध्ये अजयसह तब्बू, श्रेया सरन आणि इशिता दत्ता महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमात तब्बू एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसून येणार आहे. हा सिनेमा ”दृश्यम २’ या मल्याळम सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. अभिषेत पाठक या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहे. ‘दृश्यम २’चं नवं पोस्टर रिलीज होण्याआधी या सिनेमाचा कमाल टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. टीझर आऊट करत या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली होती. अजय देवगन स्टारर ‘दृश्यम २’ हा सिनेमा पुढील महिन्यात १८ नोव्हेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

अजयने सिनेमाचं नवं पोस्टर शेअर करत लिहिलं आहे,”खरं हे झाडाच्या मुळाप्रमाणे असतं कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी एक ना एक दिवस बाहेर येतंच”. ‘दृश्यम २’चं पोस्टर आणि ट्रेलर सध्या सोशल मीडियावर चांगलचं व्हायरल होत आहे. ‘दृश्यम २’चा ट्रेलर चाहत्यांची उत्सुकता वाढवणारा आहे.

‘दृश्यम’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येऊन सात वर्ष झाली आहे. तब्बल सात वर्षांनी या सिनेमाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २०१५ साली हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. याआधी ‘दृश्यम २’च्या सेटवरील एक फोटो शेअर करत अजयने लिहिलं होतं,विजय पुन्हा एकदा त्याच्या कुटुंबाचे रक्षण करू शकेल का?”.

हे ही वाचा:

Andheri By-Election 2022 : अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध, भाजपने घेतली माघार

Gram Panchayat Election Results 2022 : ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल, सर्व अपडेट्स…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version