Drushyam २ ची जोरदार सुरुवात; पहिल्याच दिवशी झाली एवढी कमाई

Drushyam २ ची जोरदार सुरुवात; पहिल्याच दिवशी झाली एवढी कमाई

अभिनेता अजय देवगणचा नवीन चित्रपट दृश्यम २ (Drushyam 2 ) हा कालच सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. खरं तर दृश्यम २ प्रदर्शित होण्याच्या एक दिवस आधीच १७ तारखेला ऍडव्हान्स बुकिंग मध्येच या चित्रपटाची जवळपास ३.५ कोटींची कमाई झाली होती. तर काल दृश्यम २ चित्रपटाचा सिनेमा गृहात प्रदर्शनाचा झाला. एका दिवसात दृश्यम २ ने तब्बल १४ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटात अभिनेता अजय देवगण , तब्बू असणार आहेत .

अभिनेता अजय देवगण याचा दृश्यम २ हा चित्रपट दृश्यमी च्या पहिल्या भागावरील कहाणीवरच आधारित आहे. यात अजय देवगण विजय या पात्राची भूमिका साकारत आहे.विजयच्या कुटुंबीयांकडून एका मुलाचा खून झाला आहे. आणि खुनाच्या शिक्षेपासून वाचण्यासाठी ते खून झालेल्या दिवशी विजय आणि त्याचे कुटुंब सुट्टीवर गेले होते असा बनाव करून सरकवणं सर्वांना विश्वास पटवून दिला. ती एक एक परिपूर्ण योजना होती. या कथेतून एक असा प्रवास उलगडला जातो ज्यामुळे प्रेक्षकांना या वेळी त्याचा मार्ग काय असेल याचा विचार पडतो. पहिला भाग, दृश्यम,२०१३ च्या त्याच नावाच्या मल्याळम चित्रपटाचा रिमेक होता.

चित्रपटात दाखवल्या प्रमाणे सात वर्षानंतर विजय आणि याच्या कुटुंबियांवर चाललेली केस पुन्हा उघडण्यात येते या दरम्यान चौकशीसाठी नवीन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक होते या अधिकारुयाची भूमिका अक्षय खन्ना साकारणार आहे. या वेळेस अक्षय खन्ना पासून विजय त्याच्या कुटुंबियांना वाचवण्यासाठी काय करणार आहे याचा विचार सर्वाना पडला आहे.चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये विजय काशचितर कबूल देताना दाखवलं आहे त्यामुळे प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत .

नारायण राणेंचं खळबळजनक वक्तव्य; नीलम गोऱ्हे शिवसेना सोडून चालल्या होत्या…

Air Fest 2022 : नागपुरात आज ‘एअर फेस्ट २०२२’

Exit mobile version