spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

इनस्टाग्रामवर अमोल कोल्हेच्या नावे डुप्लीकेट अकाऊंट

छत्रपती शिवाजी महाराज यांची उत्तम भूमिका साकारणारे मराठी अभिनेते तथा खासदार डॉ. अमोल कोल्हे हे एका भलत्याच अडचणीत सापडले आहेत. अमोल कोल्हे हे आपल्या सोशल मीडिया वर कायम सक्रीय असतात. विविध विषयांवर माहिती तसेच काही नव्या उपक्रमाची माहित ते आपल्या सोशल मीडिया अकाऊंट द्यारे देत असतात. पण आता सोशल मोडिया त्यांच्यासाठी डोक्याला ताप झाला आहे. त्यामागे कारणही तसच आहे. अमोल कोल्हे यांच्या नावे कुणीतरी खोटे इनस्टाग्राम अकाऊंट तयार केल्याचे समोर आले आहे. इतकेच नाही तर त्या अज्ञात व्यक्तीने पैसे उकळत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dr. Amol Kolhe (@amolrkolhe)

याबाबत अधिक माहिती स्वतः अमोल कोल्हे यांनी आपल्या इनस्टाग्राम अकाऊंट वरून एक पोस्ट शेअर करत दिली आहे. कोल्हे यांच्या नावे खोटे सोशल मीडिया अकाऊंट तयार करून लोकांची फसवणूक केली जात आहे. या व्यक्तीने अगदी अमोल कोल्हे यांच्या प्रोफाईल फोटो असणार फोटो फेक अकाऊंटच्या प्रोफाईला ठेवला आहे. संबंधित व्यक्ती अमोल कोल्हे यांच्या नावाने लोकांकडे पैसे मागत आहे. हा प्रकार समोर येताच अमोल कोल्हे यांनी या प्रकाराचे स्क्रीनशॉट शेअर करून एक पोस्ट लिहिली आहे. त्यामुळे त्यांच्या नावाने फेक अकाऊंट सुरु असून त्यातून जनतेची फसवणूक केल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ याविषयीची माहिती जनतेला दिली आहे.

हेही वाचा : 

सॅमसंग गॅलेक्सी वॉच ५ आणि वॉच ५ प्रो ची प्री-बुकिंग सुरू

एकाच दिवशी वाढदिवस साजरा करणारी सुपरहिट जोडी !

Latest Posts

Don't Miss