spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

माणूस आणि भुताच्या नात्याची रंगतदार गोष्ट ‘एक डाव भुताचा’, लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

स्मशानात जन्म झाल्यामुळे सतत भूत दिसणाऱ्या तरुणाची धमाल गोष्ट 'एक डाव भुताचा' (Ek Daav Bhutacha) या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ४ ऑक्टोबरला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाविषयी उत्सुकता वाढवणारा टीजर नुकताच सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे. 

स्मशानात जन्म झाल्यामुळे सतत भूत दिसणाऱ्या तरुणाची धमाल गोष्ट ‘एक डाव भुताचा’ (Ek Daav Bhutacha) या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ४ ऑक्टोबरला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाविषयी उत्सुकता वाढवणारा टीजर नुकताच सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे. 

रेवा इलेक्ट्रॉनिक्स या निर्मिती संस्थेने ‘एक डाव भूताचा’ या चित्रपटाची निर्मिती केली असून प्रस्तुती अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेन्मेंटने केली आहे. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन संदीप मनोहर नवरे यांनी केलं आहे. चित्रपटात अभिनेते मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव यांच्यासोत नागेश भोसले, अक्षय कुलकर्णी, हर्षद नायबळ, मयूरी देशमुख, अश्विनी कुलकर्णी, नंदिनी  वैद्य, वर्षा दांदळे यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. डॉ. सुधीर निकम आणि संदीप मनोहर नवरे यांनी पटकथा लेखन, डॉ. सुधीर निकम यांनी संवाद लेखन, गौरव पोंक्षे यांनी छायांकन, विक्रांत हिरनाईक यांनी गीतलेखन, गौरव चाटी यांनी संगीत दिग्दर्शन, प्रणव पटेल, मनु असाटी यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे. सुप्रसिद्ध गायक सोनू निगम, अवधूत गुप्ते, रोहित राऊत आणि गायिका आनंदी जोशी यांच्या सुमधुर आवाजात चित्रपटातील गाणी रेकॉर्ड करण्यात आली आहेत.

स्मशानात जन्म  झाल्यानं सतत भूत दिसणाऱ्या तरुणाची भूमिका अभिनेता सिद्धार्थ जाधवनं निभावली आहे, तर मकरंद अनासपूरे भूताच्या भूमिकेत आहेत. माणूस आणि भुताच्या नात्याची रंगतदार गोष्टीला प्रेमकहाणीचा तडकाही आहे. त्यामुळे मनोरंजक कथानक, सकस अभिनय असलेला हा चित्रपट आता मोठ्या पडद्यावर येण्याची प्रतीक्षा आहे. त्यासाठी ४ ऑक्टोबरपर्यंत वाट पहावी लागणार आहे.

हे ही वाचा:

विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी महावाचन उत्सवाचे आयोजन, उत्सवाचे ब्रँड ॲम्बेसिडर Amitabh Bachchan

मरिन लाईन ते वांद्रे सी लिंक हा प्रवास 10 मिनिटात पूर्ण होणार, धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्प ठरणार गेमचेंजर

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss