spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘इमरजेंसी’ इंदिरा गांधीच्या भूमिकेत दिसणार कंगना; टीझर आला सामोर

बोलण्याच्या पद्धतीपासून दिसण्यापर्यंत सगळ्या गोष्टी एकदम हटके आहेत.

अभिनेत्री कंगना राणावत सध्या तिच्या आगामी ‘इमरजेंसी’ या सिनेमाच्या तयारी मध्ये व्यस्थ आहे. सिनेमाच्या नावावरून कळतंय की, हा सिनेमा देशाच्या राजकारणातील घटनेवर अवलंबून आहे. कंगना या सिनेमात स्वर्गीय इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत आहे. आजच सिनेमाचा फर्स्ट लूक समोर आला असून इंदिरा गांधींच्या रूपात कंगना अगदी चपखल बसते आहे.

हेही वाचा :

एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू मुंबईत दाखल

कंगनाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून आपल्या नवीन येणाऱ्या सिनेमाचा फर्स्ट लूक शेअर केला. यामध्ये तिने इंदिरा गांधीचा लूक केला आहे. सफेद केस, चेहऱ्यावर सुरकुत्या यामध्ये कंगना विशेष उठून दिसतेए. कंगनाने सिनेमाचे पोस्टर शेअर करत, जगाच्या इतिहासामधील सगळ्यात शक्तिशाली महिलेचे चित्रण असे कॅप्शन दिले आहे.

कंगनाने सिनेमामधील एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये 1971 ची एक घटना सांगितली आहे. या व्हिडिओमध्ये इंदिरा गांधी यांना सर म्हणून संबोधत आहेत. यामध्ये कंगनाच्या बोलण्याच्या पद्धतीपासून दिसण्यापर्यंत सगळ्या गोष्टी एकदम हटके आहेत. हा सिनेमा 25 जून 2023 मध्ये रिलीज होणार आहे असे कंगनाने स्वतःहा सांगितले आहे. कंगना याआधी ‘धाकड’ या सिनेमात दिसून आली होती परंतु हा सिनेमा बॉक्स ऑफिस पूर्णपणे फ्लॉप ठरला होता. परंतु आता येणारा ‘इमरजेंसी’ सिनेमा किती हिट ठरतोय यासाठी आपल्यला सिनेमा प्रदर्शनाची वाट पहावी लागणार आहे.

Latest Posts

Don't Miss