बिग बॉसच्या घरात स्पर्धकांसोबत झाला गेम, घरातून एक स्पर्धक झाला बेघर

टेलिव्हिजनवरील बिग बॉस १७ हा एक लोकप्रिय शो आहे,जो सध्या सर्वत्र चर्चेत आहे. सध्या घरात प्रेम, वाद आणि राडा सर्वच पहायला मिळत आहे.

बिग बॉसच्या घरात स्पर्धकांसोबत झाला गेम, घरातून एक स्पर्धक झाला बेघर

टेलिव्हिजनवरील बिग बॉस १७ हा एक लोकप्रिय शो आहे,जो सध्या सर्वत्र चर्चेत आहे. सध्या घरात प्रेम, वाद आणि राडा सर्वच पहायला मिळत आहे. आता घरातील सदस्यांचा पत्ताही कट होत आहे.मागील एक आठवड्यापुर्वी घरातून मनस्वी ममगई आणि सोनिया बन्सल यांना बाहेर काढण्यात आले आहे. तर मागील आठवड्यात दिवाळी पार्टीमुळे शोमध्ये कोणतीच एलिमिनेशन प्रक्रिया झाले नाही. तर आता दिवाळी सेलिब्रेशननंतर बिग बॉसने घरातील स्पर्धकांसोबतच प्रेक्षकांना देखील धक्का दिला आहे. या आठवड्याच्या मध्येच बिग बॉसच्या घरातून आणखी एका स्पर्धकाला बेघर व्हांव लागलं  आहे. यासोबतच बिग बॉसने घरातून बाहेर काढण्यात आलेल्या स्पर्धकाचे नाव देखील जाहीर केले. तर या आठवड्यात बाहेर जाणारा स्पर्धकाचे नाव नवीद सोल आहे,नवीदला या आठवड्याच्या मध्येचं घरा बाहेर पडावं लागल आहे.

नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये, बिग बॉसने विकी जैन, सनी आर्या, अरुण महाशेट्टी, सना रईस खान आणि अनुराग डोवाल यांना दिमागच्या घरातील तीन स्पर्धकांची नावे विचारली. या स्पर्धकांनी तीन स्पर्धकांना नॉमिनेट केलं ज्यात नवीद सोल, जिग्ना व्होरा आणि रिंकू धवन यांच्या नावाचा समावेश होता. बिग बॉसने नील भट्ट, ऐश्वर्या शर्मा आणि खानजादीला नवीद, जिग्ना आणि रिंकू यापैकी एका स्पर्धकाचे नाव विचारल्यानंतर त्यांनी नवीद सोलचे नाव घेतले. त्यानंतर नवीद सोलचा घराबाहेर काढण्यात आले.

नवीदचा ‘बिग बॉस 17’ च्या घरातील प्रवास संपला आहे. नवीद सोलला सलमान खानच्या सर्वात वादग्रस्त रिअॅलिटी शो ‘बिग बॉस 17’ मधून बाहेर काढण्यात आले आहे. नवीद सोल आता शोमधून बाहेर पडणारा तिसरा स्पर्धक बनला आहे. मात्र स्पर्धक नवीदला अचानक घरातून बाहेर काढल्यामुळे नाराज झाले. तर अभिषेक कुमार, अंकिता लोखंडे, खानजादी यांना रडू कोसलले. तर घरातील इतर स्पर्धेक देखील खूप भावुक झाले आहेत.तर आता या आठवड्याच्या शेवटी विकेंड का वार मध्ये काय घडणार ? या आठवड्यात परत एलिमिनेशन होणार का ? या सगळ्या प्रश्नांची उत्तर प्रेक्षकांना आगामी भागात पाहयला मिळणार आहेत.

हे ही वाचा:

MANOJ JARANGE-PATIL: २४ डिसेंबरपर्यंत आपली कसोटी आहे, आरक्षणाचा विजय महत्त्वाचा

Snowfall Places, बर्फवृष्टीचा आनंद घ्यायचा? तर या सर्वोत्तम ठिकाणांचा नक्की करा विचार…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version