तेजस्वीनी पंडितने ट्विटवर शेअर करत देवेंद्र फडणवीस यांना केला सवाल

तेजस्विनीनं देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडीओ ट्विटवर शेअर केला आहे.

तेजस्वीनी पंडितने ट्विटवर शेअर करत देवेंद्र फडणवीस यांना केला सवाल

मराठी सिनेसृष्टीतील कलाकार हे नेहमी कोणत्यान कोणत्या विषयावरुन सोशल मीडियावर व्यक्त होत असतात,आणि त्याच दरम्यान ते चर्चेचा विषय देखील ठरतात.अशातच आता अभिनेत्री तेजस्वी पंडित हिने सोशल मीडियावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडिओ शेअर केला आणि चर्चेला उधाण आलं, तेजस्वीने शेअर केलेली पोस्ट आणि व्हिडिओ हा टोल दरवाढीवर  आहे.

टोल दरवाढीवरुन मनसे पक्ष आक्रमक झाल आहे.  या   मुद्द्यावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे  स्वतः मैदानात उतरले आहेत. अशातच अभिनेत्री तेजस्विनी पंडितच्या (Tejaswini Pandit) ट्वीटची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. तेजस्विनीनं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा एक व्हिडीओ ट्विटवर शेअर केला आहे. “आम्ही जो टोल भरत आहोत तो कुणाच्या खिशात जातोय?” असा प्रश्न तेजस्विनीनं हा व्हिडीओ शेअर करुन विचारला आहे.

तेजस्विनीनं देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे टोलच्या मुद्द्याबाबत बोलत आहेत. ते म्हणतात, “शिवसेना-भाजपाची युती असताना आम्ही जी घोषणा तेव्हा केली होती त्यानुसार आता राज्यातील सगळ्या टोलवर आम्ही छोट्या गाड्यांना टोल मुक्ती दिली आहे. महाराष्ट्रात आपण केवळ कमर्शियल-मोठ्या गाड्यांचे टोल घेतो.”  तेजस्विनीनं या व्हिडीओला दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

तेजस्विनीनं या व्हिडीओला कॅप्शन दिलं, “म्हणजे?  ह्यांना कळतंय ना नेमकं हे काय बोलतायत ? मग इतके वर्ष आम्ही जो टोल भरतो आहोत तो कुणाच्या खिशात जातोय ?  राजसाहेब तुम्हीच आता काय ते करा, महाराष्ट्राला वाचवा ह्या टोल धाडीतून !!  हे “माननीय उपमुख्यमंत्री” यांचे विधान कसे असू शकते? अविश्वसनीय! तुमचीही फसवणूक झाली असेल तर शेअर करा!” तेजस्विनीच्या या ट्वीटनं सध्या अनेकांचे लक्ष वेधले आहे.

“टोल हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा स्कॅम आहे. मला असं वाटतं याची शहानिशा झाली पाहिजे. येत्या दोन दिवसांत मी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. त्यांच्याकडून काय उत्तर येतंय ते पाहू. नाहीतर आता उपमुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे जर टू व्हिलर, फोर व्हिलरला टोल नाहीये, तर आमची माणसं प्रत्येक टोलनाक्यावर उभी राहतील आणि टू व्हिलर, फोर व्हिलरला टोल लावू दिला जाणार नाही. जर याला विरोध करायचा प्रयत्न केला तर हे टोलनाके आम्ही जाळून टाकू” असंही राज ठाकरे यांनी सांगितलं आहे.

हे ही वाचा: 

आमदार एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता, हायकोर्टानं दिलासा नाकारला

आमदार एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता, हायकोर्टानं दिलासा नाकारला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version