spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

ENTERTAINMENT: लवकरच प्रेक्षकांना पाहता येणार ‘अवतार ३’

या सिनेमाचा तिसरा भाग १९ डिसेंबर २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानंतर २१ डिसेंबर २०१९ रोजी या सिनेमाचा चौथा भाग प्रदर्शित होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासोबतच १९ डिसेंबर २०३१ मध्ये या सिनेमाचा पाचवा भाग प्रदर्शित होऊ शकतो, अशी माहिती देण्यात आली आहे.

‘अवतार द वे ऑफ वॉटर’ (Avatar: The Way of Water) या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगला धुमाकूळ घातला आहे. हा सिनेमा जेम्स कॅमेरोन (James Cameron) यांनी दिग्दर्शित केला आहे. या सिनेमाच्या यशानंतर चाहते आता ‘अवतार थ्री’ ची प्रतीक्षा करत आहेत. उत्सुक असणाऱ्या चाहतांसाठी आनंदाची बातमी म्हणजे हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘अवतार ३’ या सिनेमाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. सध्या या सिनेमाच्या पोस्ट प्रोडक्शनचे काम सुरू करण्यात आले आहे. अशातच या सिनेमाचे दिग्दर्शक जेम्स कॅमेरोन यांनी या सिनेमाच्या रिलीजबद्दल माहिती दिली आहे.

माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत जेम्स कॅमरान म्हणाले की, ‘अवतार ३’ च्या पोस्ट प्रोडक्शनच्या कामात आम्ही दोन वर्षापासून व्यस्त आहोत. त्यामुळे २०२५ च्या नाताळामध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकेल. लवकरच नव्या कलाकृतींवर काम सुरू करणार आहोत. तसेच न्यूझीलंडचे नागरिक होण्याचा विचार करत असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘अवतार ३’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई करेल असाही अंदाज त्यांच्याकडून वर्तवण्यात आला. ‘अवतार ३’ या सिनेमात अग्नी तत्वाची सुरुवात आणि दोन नव्या संस्कृतीचा समावेश असणार आहे. आगीचे प्रतिनिधित्व ऐश पीएलद्वारा करण्यात येणार आहे. यासोबतच ‘Na vi’ चा एक वेगळा दृष्टिकोन या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘अवतार ३’ या सिनेमामध्ये सॅम वर्थिंगटन, जो सलदाना, सिगरोनी वीवर, स्टीफन लेंग यांच्यासह अनेक कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका असणार आहे. या सिनेमात चार्ली चापलीन यांची नात ओना चॅपलि देखील झळकणार असल्याचे म्हटले जात आहे.

‘अवतार २’ हा सिनेमा १६ डिसेंबर २०२२ रोजी प्रदर्शित झाला होता. या सिनेमाने जगभरातील बॉक्स ऑफिस वर धुमाकूळ घातला होता. आता हा सिनेमा डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना हिंदी, तामिळ, तेलुगु, मल्याळम आणि कन्नड भाषेत पाहता येणार आहेत. या सिनेमाचा तिसरा भाग १९ डिसेंबर २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानंतर २१ डिसेंबर २०१९ रोजी या सिनेमाचा चौथा भाग प्रदर्शित होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासोबतच १९ डिसेंबर २०३१ मध्ये या सिनेमाचा पाचवा भाग प्रदर्शित होऊ शकतो, अशी माहिती देण्यात आली आहे.

हे ही वाचा:

कोरडवाहूला एकरी २५ हजार तर बागायतीला एकरी ५० हजार रुपयांची तात्काळ मदत द्या, नाना पटोलेंचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र

पूजा सावंतला मिळाला तिच्या आयुष्याचा जोडीदार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss