Tuesday, October 1, 2024

Latest Posts

‘धक धक’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

'धक धक' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये चार महिलांच्या रोड ट्रीपची झलक दाखवण्यात आली आहे.

अभिनेत्री फातिमा सना शेख (Fatima Sana Shaikh), दिया मिर्झा (Dia Mirza), रत्ना पाठक शाह (Ratna Pathak Shah) आणि संजना सांघी (Sanjana Sanghi) यांच्या ‘धक धक’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करणअयात आला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये चार महिलांच्या रोड ट्रीपची झलक दाखवण्यात आली आहे. धक धक’ या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे.

‘धक धक’ या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये चार अशा महिलांची माहिती देण्यात आली आहे, ज्यांना बाईक चालवायला आवडत असते. त्यापैकी एक रत्ना पाठक शाह आहेत. ट्रेलरमध्ये दिसते की, रत्ना  या जेव्हा रस्त्यावर बाईक चालवत असतात तेव्हा काही मुलं त्यांची खिल्ली उडवतात. पण रत्ना या त्या मुलांना सडेतोड उत्तर देतात. ट्रेलरमध्ये दिसते की, रत्ना पाठक शाह, दीया मिर्जा, संजना सांघी आणि फातिमा सना शेख या चौघी मिळून एका रोड ट्रीपला जाण्यास ठरवतात. या रोड ट्रीपमध्ये त्यांना कोणकोणत्या संकटाना सामोर जावं लागत हे या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलं आहे. दाखवण्यात येणार आहे.चित्रपटाचा ट्रेलर पाहल्यानंतर प्रेक्षकांची चित्रपट पाहण्याची उत्सुकत्ता शिगेला पोहचली आहे.

धक-धक या चित्रपटाचे लेखन पारिजात जोशी आणि तरुण दुडेजा यांनी केले आहे. तर या चित्रपटाचं दिग्दर्शन तरुण दुडेज यांनी केले आहे. BLM Pictures, Outsider Flims Productions आणि Viacom18 Studios,  अजित अंधारे, केविन वाझ आणि प्रांजल खंडारिया यांनी याची निर्मिती केली आहे. तापसी पन्नू ही धक धक या चित्रपटाची सह-निर्माती आहे.. निर्माती म्हणून तापसीचा हा दुसरा होम प्रोडक्शन चित्रपट आहे.

धक धक या चित्रपटाचे शूटिंग नवी दिल्ली, ग्रेटर नोएडा, मनाली, लेह आणि लडाख येथे झाले आहे. हा चित्रपट येत्या 13 ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. प्रेक्षक धक धक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटाच ट्रेलर पाहून प्रेक्षकांनी चित्रपटाचे कौतुक केलं आहे.

हे ही वाचा: 

राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मनसैनिक आक्रमक; अविनाश जाधवांना पोलिसांनी घेतले ताब्यात

विधान सभेच्या ५ राज्यांच्या निवडणूक जाहीर

अखेर सलमानने त्या फोटोतील मुलीचं गुपित उलगडलं! सलमानची नवी पोस्ट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss