spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘सिंघम ३’च्या सेटवर अजय देवगनचा अपघात,चित्रपटाचं शूटिंग थांबलं

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत सिंघम ३ हा चित्रपट नेहमीच चर्चेत असतो.या चित्रपटातील प्रत्येक कलाकारांचे लूक टप्याटप्याने चित्रपटाचे दिग्दर्शक रोहित शेट्टी सोशल मीडियावर शेअर करत होता.

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत सिंघम ३ हा चित्रपट नेहमीच चर्चेत असतो.या चित्रपटातील प्रत्येक कलाकारांचे लूक टप्याटप्याने चित्रपटाचे दिग्दर्शक रोहित शेट्टी सोशल मीडियावर शेअर करत होता.त्यामुळे चित्रपटातील कलाकारांचे लूक असो किंवा डायलॉग यामुळे चित्रपट सतत चर्चेचा विषय ठरत असतो.बॉलिवूड अभिनेता अजय देवगनचा  ‘सिंघम 3’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या बहुचर्चित सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे. अशातच आता ‘सिंघम 3’च्या सेटवर अपघात झाला आहे. अजय देवगनला दुखापत झाली आहे. त्यामुळे सिनेमाचं शूटिंग थांबवण्यात आलं आहे.

अजय देवगन सध्या ‘सिंघम 3’ या सिनेमामुळे चर्चेत आहे. सध्या तो या सिनेमाचं शूटिंग करत आहे. अजयसह या सिनेमात टायगर श्रॉफ, दीपिका पादुकोण, रणवीर सिंह आणि अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहेत. अजयचे चाहते आणि सिनेप्रेमी या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अजयचा धमाकेदार अंदाज या सिनेमात पाहायला मिळणार आहे. अशातच आता ‘सिंघम 3’च्या सेटवर अपघात झाला आहे. त्यामुळे या सिनेमाचं शूटिंग थांबवण्यात आलं आहे. या अपघातात अजयला दुखापत झाली आहे.

सिंघम 3’च्या सेटवर अजय देवगनला दुखापत झाली आहे.दरम्यान अजयच्या डोळ्याला दुखापत झाली आहे. डोळ्याला दुखापत झाल्याने त्याला डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागला. अजय देवगनला दुखापत झाल्याने ‘सिंघम 3’चं शूटिंग थांबवण्यात आलं आहे. लवकरच हैदराबादमध्ये या सिनेमाचं शूटिंग सुरू होईल. 2024 मध्येच या सिनेमाचं शूटिंग होईल. 2023 मध्ये हा सिनेमाचं शूटिंग होणार नाही. अजय देवगन शिवाय ‘सिंघम 3’चं शूटिंग पूर्ण होणं अशक्य आहे. तो या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहे. 

‘सिंघम 3’ या चित्रपटात चांगलीच तगडी स्टारकास्ट आपल्याला पाहयला मिळणार आहे.या सिनेमात अजय देवगनसह अक्षय कुमार, करीना कपूर, रणवीर सिंह, दीपिका पादुकोण, टायगर श्रॉफ, अर्जुन कपूर आणि श्वेता तिवारी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. हा बहुचर्चित सिनेमा आहे. याआधी प्रदर्शित झालेला सिंघम आणि सिंघम रिटर्न्स हे सिनेमे प्रदर्शित झाले असून ते प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. ‘सिंघम 3’ या चित्रपटात अजय बाजीराव सिंघमच्या भूमिकेत दिसणार आहे.या चित्रपटाच्या  दिग्दर्शनाची धुरा रोहित शेट्टी सांभाळणार आहे.रोहित शेट्टीचे चित्रपट म्हंटलं तर त्यात आपल्याला अँक्शन,गाड्यांचे अँक्शन,रोमांन्स हे सगळचं पाहयला मिळतं.त्यामुळे प्रेक्षक या सिनेमासाठी उस्तुक असल्याचं समझत आहे.

हे ही वाचा:

CM EKNATH SHINDE: हे अभियान फक्त मुख्यमंत्री किंवा महापालिकेचे नाही तर हे सर्वांचे आहे

ठाण्यातील कळवा रुग्णालयात एकाच दिवशी झालेल्या मृत्यूप्रकरणात दोन अधिकाऱ्यांचे निलंबन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss