spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

बोनी कपूर आणि लेक जान्हवी कपूर यांनी विकली तब्बल चार फ्लॅट

बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आणि निर्माते बोनी कपूर यांनी सध्या चर्चेत आहेत,दिवंगत श्रीदेवी यांच्या मृत्यू नंतर बोनी कपूर यांनी दोन्ही मुलींचा व्यवस्थित सांभाळ करत आहे

बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आणि निर्माते बोनी कपूर यांनी सध्या चर्चेत आहेत,दिवंगत श्रीदेवी यांच्या मृत्यू नंतर बोनी कपूर यांनी दोन्ही मुलींचा व्यवस्थित सांभाळ करत आहे.जान्हवी कपूर हिने श्रीदेवीच्या निधनानंतर बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं त्यानंतर नुकतच खूशी कपूरने देखील अभिनय क्षेत्रात आपलं पहिलं पाऊल टाकलं आहे. याच दरम्यान, श्रीदेवी यांच्या दोन्ही मुली आणि वडील तुफान चर्चेत आले आहेत. यामागे कारण देखील तसंच आहे. बोनी कपूर आणि त्यांच्या मुलींनी मुंबईतील चार अपार्टमेंट्स विकेले आहेत. चारही अपार्टमेंट्स अंधेरी येथील ग्रीन एकर्स परिसरातील आहेत. सध्या सर्वत्र बोनी कपूर आणि त्यांच्या मुलींची चर्चा होत आहे.

 बोनी कपूर यांनी त्यांचे अंधेरीतील 4 फ्लॅट्स आणि तेही मोठ्या रकमेत विकल्याची माहिती समोर येत आहे. बोनी कपूर आणि त्यांच्या मुलींनी त्यांचे ४ अपार्टमेंट विकल्याचं एका रिपोर्टमधून समोर आलं आहे. हे चार फ्लॅट मुंबईतील अंधेरी येथील ग्रीन एकर्स परिसरात आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, रिपोर्टमध्ये फ्लॅटची किंमतही नमूद करण्यात आली आहे. बोनी कपूर आणि त्यांच्या मुलींनी सर्व फ्लॅट 12 कोटींहून अधिक रुपयांना विकल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सर्वात मोठा फ्लॅट 1870 स्क्वेअर फूट क्षेत्रात पसरलेला होता. हा मोठा फ्लॅट अंजू नारायण आणि सिद्धार्थ नारायण यांना विकण्यात आल्याची माहिती देखील समोर येत आहे. तर मुस्कान बहिरवानी आणि ललित बहिरवानी यांनी 1614 स्क्वेअर फीटचे दोन फ्लॅट खरेदी केले आहेत. काही दिवसांपूर्वीच जान्हवी आणि खुशीने बांद्रा येथे 65 कोटींना घर खरेदी केलं. हे घर 8669 स्क्वेअर फीटचं आहे. यामध्ये एक मोठं गार्डन, स्वीमिंग पूल आणि पार्किंगचाही समावेश आहे. ईटाइम्सला दिलेल्या माहितीनुसार बोनी कपूर यांनी फ्लॅट विक्री केल्याचं कन्फर्म केलं आहे. आश्चर्य म्हणजे हे फ्लॅट्स दोन्ही खरेदीकर्त्यांना केवळ 6-6 कोटींना देण्यात आले आहेत. म्हणजेच कपूर बापलेकीने १२ कोटींना 4 फ्लॅट्स विकले आहेत. 

जान्हवी कपूर आणि अभिनेता वरुण धवन स्टारर ‘बवाल’ सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला होता. जान्हवी लवकरच ‘मिस्टर एन्ड मिसेज माही’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार असल्याची चर्चा रंगत आहे. सोशल मीडियावर देखील जान्हवी कायम सक्रिय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात. तर खुशी कपूरनेही यंदा ‘द आर्चीज’ सिनेमातून पदार्पण केलं आहे.

हे ही वाचा:

कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण

THANE: भिवंडीत फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन व फन अँड फूड फेस्टिवल साजरा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss