‘रंग माझा वेगळा’ फेम दीपा पोहोचली अनघा अतुलच्या हॉटेलमध्ये

भगरे गुरुजींच्या लेकीच्या हॉटेलमध्ये बसली कलाकारांची पंगत! यावेळी रेश्मा शिंदेने ‘वदनी कवळ’ श्लोक म्हटला.

 ‘रंग माझा वेगळा’ फेम दीपा पोहोचली अनघा अतुलच्या हॉटेलमध्ये

छोट्या पडद्यावरील ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेने नुकतचं प्रेक्षकाचा निरोप घेतला आहे.या मालिकेवर आणि मालिकेतील कलाकारांवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं,त्यामुळे या मालिकेचे बरेच भाग प्रसरित करण्यात यश येत गेलं.पण मालिका संपल्यानंतर पुढे काय करायचे असे अनेक प्रश्न कलाकारांसमोर उभे असतात,पण म्हणतात ना की आपल्या अंगी कोणते चांगले गुण असले तर आपली हार कधीच होत नाही.

तर दरम्यान आता ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्री अनघा अतुलने अलीकडेच पुण्यात ‘वदनी कवळ’ नावाचं नवीन हॉटेल सुरू केलं आहे. या हॉटेलमध्ये खवय्यांना शुद्ध शाकाहारी पारंपरिक थाळीचा आस्वाद घेता येणार आहे. अभिनेत्रीने १९ ऑक्टोबरला या हॉटेलची सुरूवात केली.

अनघा अतुल ही पंडित अतुलशास्त्री भगरे यांची मुलगी आहे. अनघाने तिच्या भावाच्या साथीने या नव्या व्यवसायाची सुरुवात केली आहे. उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी ‘रंग माझा वेगळा’ मालिकेशी संबंधित असणाऱ्या अनेक कलाकारांनी अनघाच्या हॉटेलला भेट देत अनेक मराठमोळ्या पदार्थांचा आस्वाद घेतला. यावेळी या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणाऱ्या रेश्मा शिंदेने ‘वदनी कवळ’ श्लोक म्हटला. अभिनेत्रीने यांची  झलक व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केली आहे. तसेच या पोस्टमध्ये तिने हॉटेलमधील जेवणाच्या चवीविषयी सुद्धा सांगितलं आहे.

पल्या बिझी शेड्युल मध्ये आपल सतत बाहेरच खाण होत.. मग तुम्हाला कधी अस वाटतं? आत्ता छान घरचं जेवण हवंय.. वाटतं ना? मग पुणेकरांचा हा प्रश्न सुटलाय.. अगदी घराच्या जेवणाची आठवण करु देणारं ‘वदनी कवळ ‘ हे रेसटॉरंट पुणेकरांच्या सेवेसाठी सज्ज आहे.. सुग्रस आणी सात्विक भोजनाचा आनंद घ्यायचा असेल तर वदनी कवळला नक्की भेट द्या! मी या भोजनाचा आस्वाद घेतलाय तुम्ही सुध्दा ध्या.. तुम्ही निराश होणार नाही याची खात्री आहे…अनघा आणि अखिलेश नवीन व्यवसायासह आपण आपली स्वतःची एक नवीन ओळख तयार करणार आहात. मला तुमचा अभिमान आहे. तुमचे हे नवीन कार्य तुमच्या स्वप्नापर्यंत पोहोचवणार एक धाडसी पाऊल आहे, याबद्दल तुमचे कौतुक!अनघा माझी सोबत आणि प्रेम कायमच तुझ्यासोबत आहे.
|| गणपती बाप्पा मोरया ||

दरम्यान, अभिनेत्रीच्या नव्या हॉटेलच्या पोस्टनंतर कलाकार मंडळींसह नेटकऱ्यांनी तिच्यावर अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

हे ही वाचा : 

Israel-Hamas युद्धावर प्रियंका गांधी म्हणाल्या, रक्तपात आणि हिंसाचार कधी थांबणार…

Parth Pawar यांची राजकारणात एन्ट्री होणार?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

 

 

 

 

Exit mobile version