पुढच्या वेळी उत्त प्रदेशला आलात तर… माजी IAS अधिकाऱ्याने व्हिडिओ पोस्ट करत नाना पाटेकरांना दिली धमकी

नानांचा यांचा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या व्हिडीओमध्ये ते एका व्यक्तीच्या कानाखाली वाजवताना दिसत होते.

पुढच्या वेळी उत्त प्रदेशला आलात तर… माजी IAS अधिकाऱ्याने व्हिडिओ पोस्ट करत नाना पाटेकरांना दिली धमकी

मराठीसह हिंदी मनोरंजनसृष्टी गाजवणारे अभिनेते नाना पाटेकर  हे गेल्या काही दिवसांपासुन चांगलेच चर्चेत आले आहेत. नानांचा यांचा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या व्हिडीओमध्ये ते एका व्यक्तीच्या कानाखाली वाजवताना दिसत होते. नानांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांना प्रचंड ट्रोल करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी झाल्या प्रकारा बद्दल माफी देखील मागितली. एकीकडे हा सिनेमाचा भाग असल्याचं म्हटलं गेलं तर दुसरीकडे सेल्फी घेण्यासाठी नानांजवळ गेलो असता त्यांनी कानाखाली वाजवल्याचा खुलासा चाहत्याने केला. पण आता या प्रकरणाला एक वेगळंच वळण मिळालंय. आता याप्रकरणी माजी आएएस अधिकारी अभिषेक सिंहने  व्हिडीओ शेअर करत नानांना धमकी दिली आहे. 

नाना पाटेकरांच्या कानाखाली वाजवण्याच्या प्रकरणावर माजी आयएएस अधिकारी अभिषेकने आवाज उठवला आहे. अभिषेक म्हणाला,”पीडित तरुणाने आमच्यासोबत संपर्क साधल्यास कारवाई करू. या पीडित तरुणाने स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवायला हवी”. अभिषेक सिंहच्या आता व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये नाना पाटेकर आधी चाहत्याच्या कानाखाली वाजवताना दिसत आहेत. नंतर अभिषेक याप्रकरणी आपलं मत मांडताना दिसत आहे. 

अभिषेक सिंह नाना पाटेकरांना धमकी देत म्हणाला,”उत्तर प्रदेशातील  लोकांना उत्तर कसं द्यायचं हे चांगलच माहिती आहे. आम्ही परिपूर्ण आहोत. आम्ही उत्तम स्वागत करतो, आम्ही चांगल्याप्रकारे लोकांचा आदर करतो, त्याप्रमाणे आम्ही मारहाणदेखील उत्तमच करतो. त्यामुळे पुढच्यावेळी जेव्हा तुम्ही उत्तरप्रदेशात याल तेव्हा तुमच्यासोबत चांगला व्यवहार होणार नाही याची आम्ही विशेष काळजी घेऊ”. 

नाना पाटेकर यांनी काही दिवसांपुर्वी व्हिडीओच्या माध्यमातुन झाल्या प्रकाराबद्दल माफी मागितली होती. नाना म्हणाले, “मला माहित नव्हते की तो कोण होता? मला वाटले की तो आमच्या क्रूपैकी एक आहे, म्हणून ठरलेल्या रिहर्सलनुसार मी त्याला मारलं आणि त्याला निघून जाण्यास सांगितले.

मी कधीही कोणाला फोटो काढण्यास नकार दिला नाही. मी असे कधीच केले नसते…जे काही झाले ते चुकून झाले. काही गैरसमजांमुळे हे घडले. मला क्षमा करा. मी पुन्हा असं कधीच करणार नाही.” अशी व्हिडिओ शेअर करत आपली बाजू मांडली होती.

हे ही वाचा:

जाणून घ्या खारट पदार्थांचा शरीरावर काय दुष्परिणाम होतो?

‘बिग बॉस’च्या घरात ओरीची जबरदस्त एन्ट्री,पहिल्याच दिवशी सलमान खानने उडवली ओरीची खिल्ली

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

 

Exit mobile version