spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘तुम्हें आईने की जरुरत नहीं’ अमृता फडणवीस यांच नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्या पत्नी आणि अमृता फडणवीस ह्या नेहमी कोणत्यान कोणत्या कारणांमुळे नेहमी चर्चेत असतात.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्या पत्नी आणि अमृता फडणवीस ह्या नेहमी कोणत्यान कोणत्या कारणांमुळे नेहमी चर्चेत असतात.कधी सामाजिक विषय किंवा वैयक्तिक विषयांमुळे चर्चेत येत असतात.यावेळी एका विशेष कारणामुळे ते चर्चेत आहेत.नुकतच अमृता फडणवीस यांच नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.या आधी यांची अनेक गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. तर नुकतेच आता त्यांचे एक नवे गाणे रिलीज झाले आहे. या गाण्याचं नाव “तुम्हें आईने की जरुरत नहीं” असं आहे. अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन त्यांच्या या नव्या गाण्याची माहिती नेटकऱ्यांना दिली आहे.दरम्यान अमृता फडणवीस या कायम सोशल मीडियावर सक्रीय असतात.आणि आपले नवनविन व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात.दरम्यान त्यांचा चाहता वर्ग देखील मोठा असल्याने त्यांच्या प्रत्येक पोस्टला चाहत्यांची पसंती असते.

“तुम्हें आईने की जरुरत नहीं” हे अमृता फडणवीसांचे नवे गाणे प्रदर्शित झाले आहे. दरम्यान या गाण्याचे गीतकार शब्बीर अहमद हे आहेत. तसेच अमृता फडणवीस यांच्यासोबतच मिट ब्रोज आणि पियुष मेहरोलिया यांनी देखील हे गाणं गायलं आहे.मिट ब्रोज यांनी या गाण्याला संगीत दिलं आहे. तसेच नीलोत्पल बोरा आणि पियुष मेहरोलिया हे या गाण्याचे म्युझिक प्रोड्युसर आहेत. हे गाणे  झी म्युझिक कंपनीच्या युट्यूब चॅनलवरुन शेअर करण्यात आलं आहे. गाण्याला आतापर्यंत प्रेक्षकांनी चांगली पसंती दर्शवली आहे.अमृता फडणीवस यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन “तुम्हें आईने की जरुरत नहीं” या त्यांच्या नव्या गाण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला त्यांनी कॅप्शन दिलं,”Breezy and blissful “तुम्हें आईने की जरुरत नहीं” गाणं रिलीज झाले आहे.”अमृता फडणवीस या सोशल मीडियावर सक्रिय असतात. अमृता फडणवीस  या त्यांच्या गाण्यांची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून नेटकऱ्यांना देतात.

 अमृता फडणवीस यांचे ‘मूड बना लिया’ हे गाणी काही महिन्यांपूर्वी रिलीज झालं होतं. या गाण्याला Meet Bros यांनी संगीत दिलं मोरया रे, वो तेरे प्यार का गम, तिला जगू द्या, शिव तांडव स्त्रोतम ही गाणी देखील अमृता यांनी गायली आहेत. अमृता फडणवीस यांचे वो तेरे प्यार का गम हे गाणे देखील  रिलीज करण्यात आलं होतं.आतापर्यंत गायलेल्या प्रत्येक गाण्याला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे,दरम्यान आता या गाण्याला प्रेक्षक कित पसंती देणार हे पाहणं आता औस्तुकत्तेच ठरणारं आहे.

 

Latest Posts

Don't Miss