ट्राफिकमध्ये अडकलेल्या अमृता फडणवीस यांनी वेळ घालवण्यासाठी गाडीत केला भन्नाट डान्स

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच कोणत्या कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतात.दरम्यान त्या सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.

ट्राफिकमध्ये अडकलेल्या अमृता फडणवीस यांनी वेळ घालवण्यासाठी गाडीत केला भन्नाट डान्स

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच कोणत्या कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतात.दरम्यान त्या सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.त्या आपले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच अपलोड करत असतात,त्यांचा चाहता वर्ग देखील मोठा असल्याने चाहते त्यांच्या पोस्टला नेहमी पसंती देत असतात,मात्र काही वेळा अमृता फडणवीस यांना ट्रोल देखील केलं जाते,त्यावेळी सडेतोड पणे त्या उत्तर देताना ही दिसून आल्या आहेत.

याचबरोबर त्या अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत असतात. रिल्स व्हिडीओ, फोटो, गाणी याबरोबरच त्या अनेक सामाजिक विषयांवर आपलं मत मांडताना दिसतात. सध्या त्यांचा एक रिल्स व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

अमृता फडणवीस यांनी नुकताच त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटातील ‘व्हॉट झुमका’ या गाण्यावर त्या गाडीत बसून डान्स करताना दिसत आहेत. “ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर थोडंसं मनोरंजन…” असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे.

अमृता फडणवीस यांनी वाहतूक कोंडीत वेळ घालवण्यासाठी “व्हॉट झुमका…” या ट्रेंडिग गाण्यावर रील व्हिडीओ बनवला आहे. या व्हिडीओत त्यांनी काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला असून “व्हॉट झुमका…” गाण्याला साजेसे असे मोठे गोलाकार कानातले घातले आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओला एका दिवसात ७ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

परंतु, त्याच्या या व्हिडीओवर काही नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अमृता यांनी शेअर केलेल्या व्हिडीओवर काही नेटकऱ्यांनी “हे असलं गरजेचं आहे का?”, “कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा…”, “ही पोस्ट डिलिट करा अमृता ताई” अशा कमेंट्स करत नाराजी व्यक्त केली आहे. पण, दुसरीकडे त्यांच्या चाहत्यांना हा व्हिडीओ आवडलेला आहे. “त्यांना स्वातंत्र्य आहे… त्या काहीही चुकीचं करत नाहीत” अशा कमेंट्स करत अमृता यांच्या चाहत्यांनी त्यांचं समर्थन केलं आहे.मात्र नाराजी व्यक्त करणाऱ्या नेटकऱ्यांना अमृता फडणवीस काय उत्तर देणार हे पाहणं उस्तुकत्तेच आहे.

हे ही वाचा : 

MUMBAI: कार्यालयाच्या वेळा बदला, CENTRAL RAILWAY ची मागणी

भुजबळांच्या टीकेला रोहित पवारांचं सडेतोड उत्तर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version