बिग बॉस फेम तेजस्वी प्रकाशच्या बोल्ड अंदाजाला नेटकऱ्याची नाराजी,उर्फीची बरोबरी करणार…

'बिग बॉस' फेम तेजस्वी प्रकाश ही नेहमी तिच्या फॅशन सेन्ससाठी चर्चेत असते.तीचे वेगवेगळे बोल्ड अंदाज तिच्या नवनव्या पोस्टवरुन प्रेक्षकांना पाहायला मिळत असतात.

 बिग बॉस फेम तेजस्वी प्रकाशच्या बोल्ड अंदाजाला नेटकऱ्याची नाराजी,उर्फीची बरोबरी करणार…

‘बिग बॉस’ फेम तेजस्वी प्रकाश ही नेहमी तिच्या फॅशन सेन्ससाठी चर्चेत असते.तीचे वेगवेगळे बोल्ड अंदाज तिच्या नवनव्या पोस्टवरुन प्रेक्षकांना पाहायला मिळत असतात.तर नुकताच मुंबईतल्या एका कार्यक्रमात तिचा अत्यंत बोल्ड अंदाज पाहायला मिळाला. यावेळी तिने काळ्या रंगाचा हाय स्लीट ड्रेस परिधान केला होता. अगदी कमरेपर्यंत साइड कट असलेल्या या ड्रेसमध्ये तेजस्वीला पाहून नेटकरी चांगलेच भडकले आहेत.

टेलिव्हिजनवरील ‘नागिन’ या मालिकेतून तेजस्वीने प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवले,त्यानंतर बहुचर्चित बिग बॉसच्या घरात तिने आपली खरी ओळख निर्माण केली.आणि प्रेक्षकांच्या आणखी पसंतीस उतरली.त्यानंतर तेजस्वी प्रकाश ‘बिग बॉस’च्या घरात तिच्या रिलेशनशिपमुळे सर्वाधिक चर्चेत आली. अभिनेता करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाशची जोडी सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे.दरम्यान तेजस्वी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते,ती तिचे पोस्ट शेअर करत तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.तिचा चाहता वर्ग देखील बराच मोठा आहे.त्यामुळे तिच्या प्रत्येक पोस्टला तिच्या चाहत्यांकडून पसंती मिळत असते.

अत्यंत कमी वयात तेजस्वीने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. मात्र नुकत्याच एका कार्यक्रमात तिने ज्या प्रकारचा ड्रेस परिधान केला होता, ते पाहून नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतल्या एका कार्यक्रमात तेजस्वीने हजेरी लावली होती. यावेळी तिने बोल्ड ब्लॅक साइड कट ड्रेस परिधान केला होता. या कार्यक्रमात तिने पापाराझींसमोर फोटोसाठी पोझ दिले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्यावर नकारात्मक प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली.‘तेजस्वीच्या ड्रेसिंग सेन्सला काय झालंय’, असा सवाल एका युजरने केला.

तर ‘पहिल्यांदा मला तेजस्वीचा ड्रेस अजिबात आवडला नाही,’ असं दुसऱ्याने लिहिलं. ‘हिला तर लाजच नाही. सार्वजनिक कार्यक्रमामध्ये अश्लीलचा पसरवल्याच्या आरोपात अशा लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं पाहिजे’, अशी संतप्त प्रतिक्रिया नेटकऱ्याने दिली. ‘हे सर्वजण उर्फी जावेदला टक्कर देण्याच्या प्रयत्नात आहेत वाटतं’, अशीही उपरोधिक टीका युजर्सनी केली. तेजस्वी प्रकाशचे इन्स्टाग्रामवर 70 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील ती सर्वांत लोकप्रिय अभिनेत्री असून करण कुंद्रासोबतच्या तिच्या जोडीला चाहत्यांकडून खूप प्रेम मिळतं. ‘बिग बॉस 14’मध्ये दोघांनी स्पर्धक म्हणून सहभाग घेतला होता. बिग बॉसच्या घरातच दोघं एकमेकांना डेट करू लागले. नुकतीच या दोघांनी ‘टेम्प्टेशन आयलँड इंडिया’ या शोमध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये दोघांच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधलं. तेजस्वी ही छोट्या पडद्यावरील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. नागिन या प्रसिद्ध मालिकेच्या एका एपिसोडसाठी ती दोन लाख रूपये मानधन घेत होती. सोशल मीडियाद्वारेही ती चांगली कमाई करते. करण कुंद्रासोबत ती लग्न कधी करणार, असा प्रश्न अनेकदा विचारला जातो.

एका मुलाखतीत तेजस्वीने यावर मौन सोडलं होतं. “आम्ही एकमेकांवर अजिबात दबाव टाकत नाही. मला माझ्या आणि करणच्या लग्नाबद्दल सातत्याने विचारलं जातं. करणला माहित आहे की, मी माझ्या प्रोफेशनल लाईफमध्ये एका चांगल्या ठिकाणी आहे. तो मला लग्नाबद्दल तेव्हाच बोलेल ज्यावेळी मी त्याच्यासाठी तयार असेन”, असं उत्तर तिने दिलं होतं. दरम्यान तेजस्वीचा हा फॅशन अंदाज प्रेक्षकांना अजिबात आवडला नसल्याने अनेक टीकांना तिला सामोर जावं लागत आहे.

हे ही वाचा:

Eknath Shinde यांच्याकडून जुहू बीचवर करण्यात आली स्वच्छता, रस्त्यावर पाणी मारत…

पिंपरी चिंचवडमध्ये लागलेल्या आगीत सहा कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्या प्रकरणी गुन्हा दाखल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Exit mobile version