बिग बॉसच्या घरात नवा ड्रामा,स्पर्धकांनी एकमेकांवर कॉफी फेकून केलं नॉमिनेट

टेलिव्हिजनवरील ‘बिग बॉस १७’ हा लोकप्रिय शो आहे.प्रेक्षक देखील या शोला चांगला प्रतिसाद देत आहेत.त्यामुळे टेलीव्हिजनवरील हा वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शो टीआरपीमध्येही अव्वल स्थानावर आहे.

बिग बॉसच्या घरात नवा ड्रामा,स्पर्धकांनी एकमेकांवर कॉफी फेकून केलं नॉमिनेट

टेलिव्हिजनवरील ‘बिग बॉस १७’ हा लोकप्रिय शो आहे.प्रेक्षक देखील या शोला चांगला प्रतिसाद देत आहेत.त्यामुळे टेलीव्हिजनवरील हा वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शो टीआरपीमध्येही अव्वल स्थानावर आहे. गेल्या आठवड्यात बिग बॉसच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे तेहेलका भाई उर्फ सनी आर्य याला शोमधून काढण्यात आलं. आता बिग बॉस-17 शोमध्ये एका नॉमिनेशन टास्कचं आयोजन करण्यात आलं होतं. या टास्क दरम्यान काही स्पर्धकांमध्ये बाचाबाची झाली.

या आठवड्यातील नॉमिनेशन प्रक्रिया थोड्या वेगळ्या अंदाजात आहे. नुकताच बिग बॉस-17 या कार्यक्रमाचा प्रोमो  सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये दिसत आहे की बिग बॉस स्पर्धकांना सांगतात की, “आज तुम्हाला ज्याला नॉमिनेट करायचे आहे, तुम्ही त्यांच्या चेहऱ्यावर कॉफी फेका” त्यानंतर स्पर्धक एकमेकांवर कॉफी फेकून नॉमिनेट करतात. तोंडावर कॉफी फेकून स्पर्धकांना इतर स्पर्धकाला नॉमिनेट करायचं आहे. प्रोमोमध्ये, मुनव्वर फारूकी ऐश्वर्याला नॉमिनेट करताना दिसत आहे. तो म्हणतो, “इतर स्पर्धकांच्या तुलनेत खेळात तुझा  सहभाग दिसत नाही.” तर नील अनुरागवर कॉफी फेकून त्याला नॉमिनेट करताना दिसत आहे.

तसेच अंकिता लोखंडे मन्नारा चोप्रावर कॉफी फेकून नॉमिनेट करते आणि मन्नारा अंकिताच्या तोंडावर कॉफी फेकून तिला नॉमिनेट करताना पाहायला मिळत आहे. अंकिता मन्नारा म्हणते की, “तुला मी आवडत नाही आणि मला तू आवडत नाहीस. तर मी हे शत्रूत्व कायम ठेवू इच्छिते.” तर मन्नारा अंकिताला नॉमिनेट करताना म्हणते की, “ही ज्यांच्याबरोबर आहे, त्यांच्याबरोबरच ती नाहीये. तर आता तुम्ही सगळ्यांनी ठरवा.”

याशिवाय अभिषेक सनाला नॉमिनेट करतो. तर ऐश्वर्या, अरुण अभिषेकला नॉमिनेट करतात. यावेळी अरुण आणि अभिषेकमध्ये वाद होतात. आता या अनोख्या नॉमिनेशन प्रक्रियेत स्पर्धकानी तर एकमेकांवर कॉफी फेकून नॉमिनेट तर केलं आहे,मात्र शेवटी आता कोण-कोण या आठवड्यात नॉमिनेट होणार? हे आता पुढच्या भागात पाहणं महत्तवाचं ठरणारं आहे.दरम्यान आता बिग बॉस-17 या कार्यक्रमाचा विजेता कोण ठरणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा:

DR. AMBEDKAR यांचा महापरिनिर्वाणाच्या आधीचा दिवस कसा होता?

इतर राज्यांच्या निवडणुकीचा काय होणार महाराष्ट्रावर परिणाम

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

 

Exit mobile version