spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘बिग बॉस’च्या घरात ओरीची जबरदस्त एन्ट्री,पहिल्याच दिवशी सलमान खानने उडवली ओरीची खिल्ली

‘बिग बॉस’च्या घरात ओरीची जबरदस्त एन्ट्री,पहिल्याच दिवशी सलमान खानने उडवली ओरीची खिल्ली

सध्या बिग बॉस १७ मध्ये आपल्याला रंजक वळण पाहायला मिळणार आहे.अनेक नवनवे ट्विस्ट आपल्याला आता या शो मध्ये पाहायला मिळणार आहे.ऑक्टोंबर मध्ये सुरु झालेल्या या शो मधून घरातले काही स्पर्धक बेघर देखील झाले.मात्र अंकिता लोखंडे, मुनव्वर फारूकी, विकी जैन, मनारा चोप्रा, फिरोजा खान, अभिषेक कुमार, इशा मालवीय या स्पर्धकांनी अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकून बिग बॉसद्वारे स्वत:चा एक वेगळा चाहता वर्ग तयार केला आहे.नुकतीच या आठवड्यात जिग्ना व्होरा घरातून बाहेर पडली.आणि कोणी नवीन स्पर्धक घरात एंन्ट्री घेणार अशा चर्चाना उधाण आलं होत.तर यातच आता लवकरच या शोमध्ये पापाराझी आणि असंख्य सेलिब्रिटींचा मित्र असलेल्या ओरीची एन्ट्री होणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून ओरी बिग बॉसमध्ये एन्ट्री घेणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. दरम्यान आता बिग बॉसच्या निर्मात्यांकडूनच ओरी घरात एन्ट्री घेत असल्याच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालेला आहे. दर, शुक्रवारी सलमान खान    घरातील स्पर्धकांचा क्लास घेत असतो. ‘बिग बॉस’च्या निर्मात्यांनी नुकताच या आठवड्यातील ‘वीकेंड का वार’चा नवीन प्रोमो प्रदर्शित केला. यामध्ये ओरी वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून एन्ट्री घेणार असल्याचं पाहायला मिळत आहे. ओरीचं संपूर्ण नाव ओरहान अवतारमणी असं आहे. काही दिवसांपूर्वी ओरीचे बॉलीवूड सेलिब्रिटी आणि स्टारकिड्सबरोबरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

ओरी बॉलीवूड चित्रपटांमध्ये सक्रिय नसला तरी अनेक बड्या सेलिब्रिटींपर्यंत त्याची ओळख आहे. त्यामुळे यापूर्वी अनेकदा ओरी नेमका कोण आहे? आणि तो नेमकं काय काम करतो याची सोशल मीडियावर चर्चा रंगली होती.बिग बॉस’ने नुकत्याच शेअर केलेल्या प्रोमोमध्ये सलमान खान ओरीने आणलेल्या सामानाच्या चार ते पाच बॅगा पाहून त्याची थट्टा करत असल्याचं पाहायला मिळत आहे. भाईजान ओरीला म्हणतो, “आम्ही आमच्या घरात सगळ्या सदस्यांना सन्मानाने पाठवतो, भरपूर सामान घेऊन नाही.”पहिल्याचं दिवशी सलमान खान ओरीची येथे खिल्ली उडवताना दिसून येत आहे.यावर सगळेजण हसू लागतात. ओरीच्या एन्ट्रीशिवाय आणखी बराच ड्रामा प्रेक्षकांना आजच्या ‘वीकेंड का वार’मध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

सलमान सगळ्या सदस्यांना “तुम्ही सर्वजण विकी जैन आणि मुनव्वर फारुकीच्या हाताखालचे बाहुले झाला आहात”, असे खडेबोल सुनावणार आहे. दरम्यान, आता ओरीने घरात एन्ट्री घेतल्यावर नेमकं काय बदलणार? ओरी या तगड्या स्पर्धकांना पुरून उरणार की नाही?ओरीचा घरातला वावर कसा असेल? ओरीमुळे आता कोणते नवे ड्रामे पाहायला मिळणार हे आता येणाऱ्या पुढील भागात प्रेक्षकांना पाहयला मिळणार आहे.

 

Latest Posts

Don't Miss