spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

बिग बॉसच्या घरात विकी जैनने अंकिता लोखंडेवर उचलला हात,व्हिडिओ व्हायरल होताच नेटकरी करतायत ट्रोल    

टेलिव्हिजनवरील बिग बॉस १७ हा कार्यक्रम सध्याचा लोकप्रिय शो आहे.या कार्यक्रमात होणारे राडे,भांडण,ड्रामा हे दररोज वेगवेगळ वळण घेत आहे.

टेलिव्हिजनवरील बिग बॉस १७ हा कार्यक्रम सध्याचा लोकप्रिय शो आहे.या कार्यक्रमात होणारे राडे,भांडण,ड्रामा हे दररोज वेगवेगळ वळण घेत आहे. बिग बॉसच्या घरात दररोज धक्कादायक ट्विस्ट येत आहेत. बिग बॉस या कार्यक्रमात अंकिता लोखंडे पती विकी जैनसोबत सहभागी झाली आहे. हे दोन्ही स्पर्धक सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. आता या कार्यक्रमात विकी थेट अंकिताला मारताना दिसून आला आहे.

‘बिग बॉस 17’मध्ये एन्ट्री करण्याआधी अंकिता लोखंडे आणि विकी जैन सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय होते. पण ‘बिग बॉस’च्या घरात मात्र सतत ते एकमेकांसोबत वाद घालताना दिसत आहेत. या कार्यक्रमातील सर्वच स्पर्धक एकमेकांसोबत मोठ्या प्रमाणात भांडताना दिसून येत आहेत. ‘बिग बॉस 17’च्या नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये अंकिता लोखंडे, विकी जैन, अभिषेक कुमार आणि अरुण माशेट्टी यांच्या जोरदार भांडण झालेला पाहायला मिळाला. अभिषेक कुमार विकीसोबत एका विषयावर वाद घालताना दिसून येतो. दरम्यान त्यांच्या भांडणात अंकिताची एन्ट्री होते. त्यानंतर विकी जैन अंकिता लोखंडेवर धावून जातो आणि तिला शांत राहायला सांगतो.

विकीच्या वागण्यामुळे अंकितालाही शॉक बसतो. यानंतर, विकी रागाने बेडवरून उठतो आणि अभिषेकला दुसऱ्या बाजूला येण्यास सांगतो. त्याचवेळी विक्की जैनचे असे वागणे पाहून अरुणही थक्क होतो आणि म्हणतो – ‘अरे देवा, हे काय बघायला मिळालं…’सध्या या एपिसोडचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. विकी जैनच्या या वागण्यावरून सोशल मीडियावर नेटकरी संताप व्यक्त करत आहे. विकीला प्रचंड ट्रोल केले. विकी जैन अंकिता लोखंडेवर धावून गेला हे प्रचंड वाईट आहे. विकी जैन त्याच्या पत्नीची किंमत करत नाही. नॅशनल टीव्हीवर पत्नीसोबत असं वागत असेल तर घरी कसा वागत असेल, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.

‘बिग बॉस 17’च्या घरात अंकिता लोखंडे आणि विकी जैन अनेकदा भांडताना दिसून येतात. काही दिवसांपूर्वी आयशासोबत बोलताना अंकिता म्हणाली की,”विकीचं माझ्यावर प्रेम आहे हे मला माहिती आहे. पण मला काय हवं या गोष्टीचा विकी कधी विचार करत नाही. बिग बॉसच्या घरात मी कधी कोणत्या पुरुष स्पर्धकासोबत भांडते तेव्हा विकी मला थांबवण्याचा प्रयत्न करतो”.अंकिता लोखंडे 2021 मध्ये उद्योगपती विकी जैनसोबत लग्नबंधनात अडकली आता विकेंड का वारमध्ये सलमान खान यावर काय प्रतिक्रिया देतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा:

रोज अंजीर खाल्ल्याने शरीराला होतात ‘हे’ फायदे; जाणून घ्या सविस्तर माहिती

येत्या नवीन वर्षात तूम्ही SIP मध्ये गुंवणूक करण्याचा करताय तर हे नक्की वाचा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss