प्रभासने डिलीट केले सोशल मीडिया अकाउंट चर्चांना उधाण

सुपरस्टार प्रभासने त्याचं सोशल मीडिया अकाउंट डिलीट केलं आहे. तर ही बातमी अगदी खरी आहे., त्याने त्याचं इन्स्टाग्राम अकाउंट डिलीट केलं आहे

प्रभासने डिलीट केले सोशल मीडिया अकाउंट चर्चांना उधाण

दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा(prabhas) सोशल मीडिया अकाउंट डिलीट झाल्याची जोरदार चर्चा आता सगळीकडे होत आहे.प्रत्येक कलाकार हा त्याच्या खाजगी आयुष्य म्हणा किंवा त्याच्या कामानिमित्त का होईना चर्चेत हा येतचं असतो,तसं यावेळी प्रभास सोशल मीडिया अकाउंट डिलीट करण्यामुळे झाला आहे.

दरम्यान प्रभासचा आता ‘सालार’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘आदिपुरुष’ अपयशा नंतर प्रभासच्या आगामी चित्रपटाकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. शाहरुख खानच्या ‘डंकी’बरोबर हा चित्रपट २२ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. हे दोघही सध्या बॉलीवूडमधील आघाडीचे अभिनेते आहेत.तर यातच आता  दोन्हीच्या प्रदर्शनाची तारीख आल्यानंतर या दोन्ही आघाडीच्या अभिनेत्यांच्या चित्रपटाच्या क्लॅशची जोरदार चर्चा होणार आहे. अशातच प्रभासबाबत एक बातमी समोर आली आहे.

सुपरस्टार प्रभासने त्याचं सोशल मीडिया अकाउंट डिलीट केलं आहे. तर ही बातमी अगदी खरी आहे., त्याने त्याचं इन्स्टाग्राम अकाउंट डिलीट केलं आहे. त्यानंतर त्याने अकाउंट नेमकं का डिलीट केलं, याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. प्रभास सोशल मीडियावर फार सक्रिय नाही, पण सर्व सोशल मीडियावर त्याचे अकाउंट्स होते. अशातच त्याने अचानक इन्स्टाग्राम अकाउंट डिलीट केल्याने चाहत्यांना धक्का बसला आहे.

प्रभासचे अकाउंट जाणीवपूर्वक डिलीट करण्यात आलं असावे असा अंदाज वर्तवला जात आहे. तर, शाहरुख खानचा ‘डंकी’ व प्रभासचा ‘सालार’ एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रभासचं अकाउंट डिलीट करण्यात आलं असावं, असंही म्हटलं जात आहे. पण अद्याप प्रभास किंवा त्याच्या टीमकडून याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.तर आता प्रभासने नेमकं कोणत्या कारणामुळे अकाउंट डिलीट केलं आहे,अशी कोणती गोष्ट आहे ज्यामुळे प्रभासला आपलं अकाउंट डिलीट कराव लागलं हे अजुनही स्पष्ट झालेलं नाही.

दरम्यान प्रभासचा चाहता वर्ग देखील मोठा असल्यामुळे त्याच्या आगामी सालार चित्रपटासाठी प्रेक्षक मोठ्या प्रमाणात उत्सुक असल्याचं समझत आहे.त्याचबरोबर शाहरुखचा ‘डंकी’ हा चित्रपट देखील त्याचवेळी प्रदर्शित होणार आहे,त्यामुळे आता बॉक्स ऑफिसवर कोण आपलं वर्चस्व टिकवणार हे पाहणं औस्तुकत्तेचं ठरणारं आहे.

हे ही वाचा : 

बिग बॉस १७ प्रेक्षकांच्या भेटीला,१७ स्पर्धक सहभागी

नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी केली जाते ‘ब्रह्मचारिणी’ देवीची पूजा; जाणून घेऊयात स्वरूप,माहिती,पूजन आणि मंत्र

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Exit mobile version