spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पंकज त्रिपाठीच्या कडक सिंह चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

बॉलीवूड अभिनेता पंकज त्रिपाठी यांचा आगामी कडक सिंह या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.आपल्या अभिनय शैलीतून पंकज त्रिपाठी प्रेक्षकांच्या मनात आपलं विशेष स्थान निर्माण केलं आहे.

बॉलीवूड अभिनेता पंकज त्रिपाठी यांचा आगामी कडक सिंह या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.आपल्या अभिनय शैलीतून पंकज त्रिपाठी प्रेक्षकांच्या मनात आपलं विशेष स्थान निर्माण केलं आहे. सध्या त्यांच्या ‘कडक सिंह’ (Kadak Singh) या चित्रपटामुळे ते चांगलेच चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं. आता या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.‘कडक सिंग’चा वर्ल्ड प्रीमियर गोव्यात इफ्फीमध्ये ‘गाला प्रीमियर्स’ मध्ये दाखवला गेला.या ट्रेलरमधील पंकज त्रिपाठी यांच्या अभिनायनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

पंकज त्रिपाठी ‘कडक सिंह’ या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये एके श्रीवास्तव ही भूमिका साकारताना दिसत आहेत, एके श्रीवास्तवचा स्मृतिभ्रंश झाला आहे. त्यामुळे त्याला बऱ्याच गोष्टी आठवत नाहीयेत, असं ट्रेलरमध्ये दिसत आहे. ‘कडक सिंह’ या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर हा चित्रपट क्राईम थ्रिलर असल्याचं समझत आहे. कडक सिंग उर्फ एके यांच्या भूतकाळात घडलेल्या घटना सत्यात  दाखवल्या जातात. ह्या घटनांमुळे एकेंना भुतकाळाशी काही ताळमेळ लागत नाही. एका बाजूला आर्थिक गुन्हे शाखा त्यांचा पाठलाग करतात तर दुसऱ्या बाजुला आपले मोडकळीला आलेले कुटुंबही त्यांना धरून ठेवायचंय. वेगवान आणि गुंतागुंतीच्या घटनांमुळे ट्रेलर उत्कंठावर्धक होतो.

‘कडक सिंह’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर या ट्रेलरमधील पंकज त्रिपाठी यांच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं आहे. ‘कडक सिंह’ हा चित्रपट  8 डिसेंबर 2023 रोजी रिलीज होणार आहे. हा चित्रपट झी-5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होत आहे. पंकज त्रिपाठी यांचे चाहते या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. पंकज त्रिपाठी यांनी कडक सिंह चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे. या ट्रेलरला त्यांनी कॅप्शन दिलं, “एक अपघात, चार कथा,एक अस्पष्ट सत्य कडक सिंह सत्य शोधू शकतील का? ट्रेलर आऊट!”

‘कडक सिंह’ या चित्रपटामध्ये या चित्रपटामध्ये  संजना संघीनं साक्षी श्रीवास्तव ही भूमिका साकारली आहे. तर पार्वती टीनं या चित्रपटात हेड नर्सची भूमिका साकारली आहे. ‘कडक सिंह’ चित्रपटातील नैना ही भूमिका जया अहसाननं साकारली आहे. तसेच या चित्रपटात दिलीप शंकर,परेश पाहुजा, वरुण बुद्धदेव  या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. दरम्यान आता प्रेक्षकांना या चित्रपटाबाबतची उस्तुकत्ता शिगेला पोहचली आहे.

हे ही वाचा:

SIM CARD खरेदी आणि विक्रीच्या नियमांत मोठे बदल

Rajasthan Election 2023, उदयपूरमधील सभेत राहुल गांधी म्हणाले, जातीची जनगणना…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss