spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘हनुमान’ चित्रपटाचा अनोखा ट्रेलर प्रदर्शित,पौराणिक कथेवर भर

मागील काही दिवसांपासुन सिनेसृष्टीत नवनवीन विषयांवरचे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अशातच एका नवीन सिनेमाचा आगळावेगळा ट्रेलर भेटीला आलाय.

मागील काही दिवसांपासुन सिनेसृष्टीत नवनवीन विषयांवरचे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अशातच एका नवीन सिनेमाचा आगळावेगळा ट्रेलर भेटीला आलाय. ‘हनुमान’  हा चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.तर नुकताच आज ‘हनुमान’ सिनेमाचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर भेटीला आलाय. ट्रेलर प्रद४शित होताच तो ट्विटरवर ट्रेंड झाला असून लोकांच्या पसंतीस उतरला आहे. ट्रेलरने प्रेक्षकांची सिनेमाबद्दलची उत्सुकता देखील आणखी वाढली आहे.या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार तेजा सज्जा मुख्य भुमिकेत दिसून येणार आहे.

‘हनुमान’चा ट्रेलर खूपच जबरदस्त आहे. अंगावर शहारे आणणाऱ्या या ट्रेलरने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पौराणिक कथा आणि कल्पनांचं मिश्रण या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतं की, एका हिरव्यागार निसर्गरम्य परिसरात बजरंगबलीचा भव्यदिव्य पुतळा दिसतो. त्याच गावात एक तरुण चित्त्याच्या वेगाने जंगलात धावत असलेला दिसतो.दुसरीकडे एका अज्ञात ठिकाणी एक दृष्ट प्रवृत्तीचा खलनायक सामान्य माणसांना त्रास देत असतो. पुढे मग बजरंगबलीचा आशिर्वाद घेऊन अद्भुत शक्तींच्या जोरावर गावातील तो तरुण गुंडाचा कसा सामना करतो, तर या ट्रेलरमधील अनेक सीन्स प्रेक्षकांच्या अंगावर शहारे आणणारे आहेत. 

‘हनुमान’च्या ट्रेलरमध्ये अनेक अॅक्शन सीन पाहायला मिळणार आहेत. बॅकग्राऊंडमधील संस्कृत श्लोक सिनेमाला शानदार बनवण्यात यशस्वी ठरले आहेत. तब्बल 11 भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. हनुमान या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रशांत वर्मा यांनी केलं आहे. या  चित्रपटाची कथा देखील प्रशांत यांनी लिहिली आहे. तेलुगू, हिंदी, मराठी, तामिळ, कन्नड, मल्याळम, इंग्रजी, स्पॅनिश, कोरियन, चिनी आणि जपानी अशा 11 भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. 

‘हनुमान’ या सिनेमात तेजा सज्जासह विनय राय, अमृता अय्यर, वरलक्ष्मी सरथ कुमार, राज दीपक शेट्टी, वेनेला किशोरसह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. अंजनदारी या काल्पनिक गावावर आधारित हा सिनेमा आहे. प्रशांत वर्माने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 12 जानेवारी 2024 रोजी हा सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. निरंजन रेड्डीने या सिनेमाची निर्मिती केली आहे.’हनुमान’ या सिनेमात तेजा सज्जा एका दलित व्यक्तीची भूमिका साकारणार आहे. विनय राय या सिनेमात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.या चित्रपटाच्या जबरदस्त ट्रेलर पाहल्यानंतर या सिनेमाबाबतची प्रेक्षकांची उस्तुकत्ता वाढली आहे.

हे ही वाचा:

Latest Posts

Don't Miss