हृतिक रोशनचा ‘फायटर’ चित्रपटातील लूक प्रदर्शित

बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशनचा आगामी ‘फायटर’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.या चित्रपटासाठी हृतिक रोशनचा आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे.

हृतिक रोशनचा ‘फायटर’ चित्रपटातील लूक प्रदर्शित

बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशनचा आगामी ‘फायटर’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.या चित्रपटासाठी हृतिक रोशनचा आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे.बऱ्यांच दिवसांपासून हृतिकच्या चित्रपटासाठी प्रेक्षक आतूर असल्याने  या चित्रपटाबद्दल चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. आता या चित्रपटामधील हृतिकचा लूक रिलीज करण्यात आला आहे. ‘फायटर’ या  चित्रपटातील हृतिक रोशनचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. त्याच्या या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.हृतिक सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो,तो त्याचे अपडेट वेळोवेळी त्याच्या चाहत्याबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असतो.

यातच आता हृतिक  रोशननं सोशल मीडियावर त्याच्या फायटर या चित्रपटामधील लूकचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करुन त्यानं चित्रपटामधील त्याच्या भूमिकेची माहिती दिली आहे. ‘फायटर’ या  चित्रपटामध्ये हृतिक हा स्क्वाड्रन लीडर समशेर पठानिया ही भूमिका साकारणार आहे.

त्याच्या फायटर या चित्रपटामधील लूकचा फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, “स्क्वाड्रन लीडर समशेर पठानिया, कॉल साइन-पॅटी, डेजिग्नेशन: स्क्वाड्रन, पायलट, यूनिट: एयर ड्रॅगन्स, फाइटर फॉरएवर” फायटर या चित्रपटाच्या माध्यमातून हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण ही जोडी  पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार आहेत. त्यामुळे आता त्यांची जोडी पाहण्यासाठी  प्रेक्षक आतुर आहेत. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या चित्रपटात अनिल कपूर यांनी देखील महत्वाची भूमिका साकारली आहे. सिद्धार्थचा हृतिकसोबतचा हा तिसरा चित्रपट असणार आहे. याआधी दोघांनी ‘वॉर’, ‘बँग बँग’ या चित्रपटांसाठी एकत्र काम केले आहे. फाइटर’ हा चित्रपट पुढच्या वर्षी 25 जानेवारी 2024 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

काही दिवसांपूर्वी फायटर या चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज करण्यात आलं होतं. या मोशन पोस्टरमध्ये अनिल कपूर, हृतिक आणि दीपिका यांचा डॅशिंग अंदाज पाहायला मिळाला.दरम्यान आता या चित्रपटात हृतिक आणि दीपिकाची केमिस्ट्री प्रेक्षकांना किती भावते हे पाहणं आता औस्तुकत्तेचं ठरणार आहे,त्यामुळे प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.

Exit mobile version