बॉलीवूडच्या आघाडीच्या अभिनेत्याबरोबर प्रिया बापट करणार स्क्रिन शेअर,आगामी प्रोजेक्टची घोषणा

मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापट ही सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.प्रिया ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.

बॉलीवूडच्या आघाडीच्या अभिनेत्याबरोबर प्रिया बापट करणार स्क्रिन शेअर,आगामी प्रोजेक्टची घोषणा

मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापट ही सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.प्रिया ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.ती वेळोवेळी तिचे अपडेट सोशल मीडियावर शेअर करत असते. राजकीय विषयावर आधारित असलेल्या ‘सिटी ऑफ ड्रीम्स’मध्ये प्रिया बापटने पूर्णिमा गायकवाड ही दमदार भूमिका साकारली होती. या सीरिजचे आतापर्यंत तीन भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. यातील प्रियाच्या अभिनयाचं विशेष कौतुक करण्यात आलं. . नाटक, चित्रपट, मालिका, सीरिज अशा सगळ्या माध्यमांमध्ये तिने आपल्या अभिनयाच कौशल्य दाखवलं आहे. मराठीतच नाही तर प्रियाने बॉलीवूडमध्ये देखील काम करत प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे.

प्रिया बापट सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तर नुकतच प्रियाने एक पोस्ट शेअर केली आहे,या पोस्टने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. कारण, ‘सिटी ऑफ ड्रीम्स’च्या घवघवीत यशानंतर प्रिया बापट लवकरच एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये काम करणार आहे. प्रिया बापटला थेट बॉलीवूड अभिनेता नवाजुद्दिन सिद्दिकीबरोबर काम करण्याची संधी मिळाली आहे. इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने तिच्या सगळ्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.

प्रियाने तिच्या आगामी प्रोजेक्टची खास झलक शेअर करत “मी या संपूर्ण प्रवासासाठी खूपच उत्साही आहे” असं कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. प्रिया बापट बॉलीवूड अभिनेता नवाजुद्दिन सिद्दिकीबरोबर काम करणार असल्याचं पाहून तिच्या चाहत्यांनी कमेंट्स सेक्शनमध्ये अभिनेत्रीवर कौतुकाचा वर्षाव करण्यास सुरूवात केली आहे.

नवाजुद्दिन सिद्दिकीने देखील प्रिया बापटचा खास फोटो शेअर करत आगामी प्रोजेक्टची घोषणा केली आहे. त्याने शेअर केलेल्या फोटोवर “नवाज सर तुमच्याबरोबर काम करणं ही मोठी गोष्ट आहे” असं प्रियाने म्हटलं आहे. ‘प्रोडक्शन ८’ हा थ्रिलर प्रोजेक्ट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच प्रियाचं ‘जर तरची गोष्ट’ हे नाटक देखील प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. ‘जर तर ची गोष्ट’ या नाटकाचे प्रयोग केवळ पुण्यात आणि मुंबईत नाही तर परदेशात देखील पार पडले.दरम्यान  आता प्रियाच्या आगामी प्रोजेक्टची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. 

हे ही वाचा:

फोन उचलल्यावर सर्वात आधी आपण ‘Hello’ का बोलतो?

THANE SHRIKANT SHINDE: ग्रंथालयाचे लोकार्पण आणि अनेक विकासकामांचा आढावा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

 

Exit mobile version