बिग बॉस १७ प्रेक्षकांच्या भेटीला,१७ स्पर्धक सहभागी

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’चे १७ चे नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

बिग बॉस १७ प्रेक्षकांच्या भेटीला,१७ स्पर्धक सहभागी

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’चे १७ चे नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. मागच्या काही दिवसांपासून या शोची सगळीकडेच जोरदार चर्चा होती. बिग बॉस हा रिअॅलिटी शो सगळ्याच वयोगटातील प्रेक्षक बघत असतो.प्रत्येकालाच हा शो आवडतो,शो सुरु होण्याआधी यामध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार याबाबत चाहत्यांमध्येही उत्सुकता असते. सलमान खानच्या या शोचे रविवारी प्रिमिअर पार पडले. त्यानंतर अखेर १७ व्या पर्वातील स्पर्धकांची नावं समोर प्रेक्षकांसमोर आली आहेत. यामध्ये अनेक लोकप्रिय चेहरे आपल्याला या बिग बॉसच्या घरात पाहायला मिळतील.

यंदा ‘बिग बॉस’च्या १७ पर्वात १७ स्पर्धक सहभागी झाले आहेत. १०५ दिवसांचा मुक्काम त्यांचा या घरात असणार आहे.. या पर्वात एक विशेष गोष्ट म्हणजे यावेळी घरात  दोन जोडप्यांची देखील एंट्री झाली आहे. छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अंकिता लोखंडेने पती विकी जैनबरोबर शोमध्ये सहभाग घेतला आहे. याशिवाय कॉमेडियन व लॉक अप शोचा विजेता मुनव्वर फारुकीदेखील या पर्वात दिसणार आहे. इतकंच नाही तर ब्रेकअप झालेले दोन कलाकारदेखील शोमध्ये सहभागी झाले असून ग्रँड प्रिमिअरमध्येच त्यांचं भांडण झालं, जे सोडवायला सलमान खानला मध्यस्थी करावी लागली.

मुनव्वर फारुकी, मन्नारा चोप्रा,  , नील भट, नवीद सोल, ऐश्वर्या शर्मा ,अनुराग डोभाल/बाबू भैया (मोटोव्लॉगर), सना रईस खान (वकील), जिग्ना व्होरा (एक्स क्राइम रिपोर्टर), अंकिता लोखंडे, विकी जैन, सोनिया बन्सल, खानजादी (फिरोजा खान), सनी आर्या (तहलका भाई), रिंकू धवन, अरुण माशेट्टी, अभिषेक कुमार आणि ईशा मालवीय हे १७ स्पर्धक यावेळी बिग बॉसच्या घरात कल्ला करायला सज्ज झाले आहेत.

दरम्यान,यावेळी  ‘बिग बॉस’च्या या पर्वात अनेक नवीन गोष्टी पाहायला मिळतील. यावेळी बरेच ट्विस्ट आपल्याला घरात बघायला मिळणार आहेत.त्यामुळे प्रेक्षकांना या पर्वाची अधिक उत्सुकत्ता आहे.घर तीन विभागांमध्ये विभागले गेले आहे आणि ते ‘दिल, दिमाग आणि दम’ थीमवर आधारित आहे. हा शो प्रेक्षकांना कलर्स टीव्हीवर पाहता येईल. तसेच जिओ सिनेमा अॅप आणि वेबसाइटवर इथेही शोचे स्ट्रीमिंग केले जाईल.

हे ही वाचा : 

नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी केली जाते ‘ब्रह्मचारिणी’ देवीची पूजा; जाणून घेऊयात स्वरूप,माहिती,पूजन आणि मंत्र

मुंबईच्या एन्ट्री पॉईंटवर मनसेची नजर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Exit mobile version