‘टायगर ३’ ने दोन दिवसांत बॉक्स ऑफिसवर जमवला १०० कोटींचा गल्ला

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा बहुचर्चित 'टायगर 3' (Tiger 3) हा सिनेमा अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई करत आहे.

 ‘टायगर ३’ ने दोन दिवसांत बॉक्स ऑफिसवर जमवला १०० कोटींचा गल्ला

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा बहुचर्चित ‘टायगर 3’ (Tiger 3) हा सिनेमा अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई करत आहे. एकंदरीतच सलमानच्या ‘टायगर ३’ ने दिवाळीत धमाका केला आहे. मध्यरात्री शो, ब्लॅकमध्ये तिकीटांची विक्री, थिएटर बाहेर फटाके फोडणं ते चाहत्यांचा जल्लोष अशा सर्व गोष्टी पाहायला मिळत आहेत.

सलमान खानचा काही दिवसांपूर्वी आलेला ‘किसी का भाई किसी की जान’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात कमी पडला होता. त्याआधीही सलमानच्या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर निराशाजनक कामगिरी केली. त्यामुळे भाईजानचा ‘टायगर 3’ या सिनेमा किती कमाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.

रिलीजच्या पहिल्या दिवशी ४४.५० कोटींची बंपर कमाई केल्यानंतर आता ‘टायगर ३’च्या दुसऱ्या दिवसाची सुरुवातीची आकडेवारी समोर आली आहे. ‘सॅकनिल्क’च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘टायगर ३’ ने दुसऱ्या दिवशी ५७.५० कोटी रुपये कमावले आहेत. या चित्रपटाची अवघ्या दोन दिवसांची एकूण कमाई आता १०२ कोटी रुपये झाली आहे. इतकंच नाही तर या चित्रपटाने शाहरुख खानच्या ‘पठाण’, ‘जवान’ तसेच ‘बाहुबली २’ सह अनेक चित्रपटांचे रेकॉर्डही मोडले आहेत.

12 नोव्हेंबर 2023 रोजी  ‘टायगर 3’ हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी ४४.५० कोटींची बंपर कमाई केल्यानंतर आता ‘टायगर ३’च्या दुसऱ्या दिवसाची सुरुवातीची आकडेवारी समोर आली आहे. ‘सॅकनिल्क’च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘टायगर ३’ ने दुसऱ्या दिवशी ५७.५० कोटी रुपये कमावले आहेत. या चित्रपटाची अवघ्या दोन दिवसांची एकूण कमाई आता १०२ कोटी रुपये झाली आहे. इतकंच नाही तर या चित्रपटाने शाहरुख खानच्या ‘पठाण’, ‘जवान’ तसेच ‘बाहुबली २’ सह अनेक चित्रपटांचे रेकॉर्डही मोडले आहेत.

सलमानच्या ‘टायगर 3’ने रिलीजच्या दोन दिवसांत बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे. ‘बाहुबली 2’ने दोन दिवसांत 40.25 कोटी, गदर ने 38.7 कोटी, टायगर जिंदा है या सिनेमाने 36.54 कोटी, जवानने 30.5 कोटी, बजरंगी भाईजानने 27.05 कोटी, ‘केजीएफ चॅप्टर 2’ने 25.57 कोटी ,तर आता पर्यंत टायगर ३ ने या सर्व सिनेमा पेक्षा जास्त झेप घेतली आहे.

सलमानचा सिनेमा पाहायला गेलेले प्रेक्षक थिएटरमध्ये जल्लोष करत फटाकेदेखील फोडत आहेत. याबद्दल भाईजानने ट्वीट करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्याने लिहिलं आहे,”टायगर 3′ दरम्यान थिएटरमध्ये फटाके वाजवले जात आहेत. ही धोकादायक बाब आहे. स्वत:चा आणि इतरांचा जीव धोक्यात न घालता सिनेमाचा आनंद घ्या. सुरक्षित राहा”.

हे ही वाचा : 

सई ताम्हणकरच्या नव्या घरात दिवाळीनिमित्त खास कार्यक्रम! ‘या’ मराठी कलाकारांनी लावली हजेरी

हमासवर विश्वास नाही – इस्रायली संरक्षणमंत्र्यांचा दावा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version