spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अभिनेत्री रुबीना दिलैकच्या घरी आल्या लक्ष्मी,दिला दोन जुळ्या मुलींना जन्म

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री रुबीना दिलैक गेल्या काही दिवसांपासून तिच्या गरोदरपणाला धरुन खुप चर्चेत आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री रुबीना दिलैक गेल्या काही दिवसांपासून तिच्या गरोदरपणाला धरुन खुप चर्चेत आहे.तर नुकतीच आता रुबीनाने तिच्या चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे.दरम्यान रुबीना दिलैक आणि तिचा पती अभिनव शुक्ला यांच्या आयुष्याला आता नवी सुरुवात झाली आहे.लक्ष्मींच्या पावलांनी यांच्या घरात दोन गोंडस जुळ्या मुलींनी जन्म घेतला आहे.रुबीना आणि अभिनव आई-बाबा झाले आहेत.आता रुबीना आणि अभिनवदेखील ही जबाबदारी घेण्यास सज्ज झाले आहेत. ही गोष्ट स्वतः अभिनेत्रीच्या ट्रेनरने शेअर केली आहे. अभिनेत्रीच्या ट्रेनरने एक पोस्ट शेअर केली आहे मात्र नंतर तिने ती पोस्ट डिलीट केली आहे. मात्र चाहते रुबीनावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

रुबीनाने सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. कारण चाहत्यांमध्ये ती आई झाल्याची बातमी लीक झाली.रुबीना आणि अभिनव आपल्या जुळ्या मुलांची आतुरतेने वाट पाहत होते. अभिनेत्रीने तिच्या व्हिडिओमध्ये आपण जुळ्या मुलांना जन्म देणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर चाहते तिच्या आई होण्याची आतुरतेने वाट पाहत होते.रुबीना गरोदर राहिल्या पासून तिने सोशल मीडियावर आपले अनेक व्हिडिओ आणि फोटोशूट केलेले फोटो शेअर केले होते,रुबीनाचा चाहता वर्ग देखील मोठा असल्याने तिच्या त्या फोटोनां देखील चाहत्यांनी चांगली पसंती दिली हेती.

दरम्यान आता रुबीनाने दोन जुळ्या मुलींना जन्म दिल्याचं सांगितलं जातंय. १६ डिसेंबर २०२३ रोजी अभिनेत्रीच्या फॅन पेजने एक पोस्ट करत तिने जुळ्या मुलींना जन्म दिल्याचा सांगितलं आहे. रुबीनाच्या ट्रेनरने ही बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती. तिने सुरुवातीला ‘दोन जुळ्या मुलींसाठी रुबीना तुझं अभिनंदन’ अशी पोस्ट केली होती. मात्र नंतर तिने ती पोस्ट एडिट करून फक्त ‘अभिनंदन’ असं लिहिलं.

फॅन पेजने ही माहिती देताच चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. मात्र चाहते रुबीनावर नाराज आहेत. आता रुबीना आणि अभिनव स्वतःहून चाहत्यांना ही बातमी कधी सांगणार यासाठी चाहते आतुर आहेत.

हे ही वाचा:

Latest Posts

Don't Miss