spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

 आईची जुनी साडी… मुलांना दिवाळीसाठी नवे कपडे;रितेशची हटके संकल्पना

अभिनेता रितेश देशमुख सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो,तो नवनविन व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच पोस्ट करत असतो,त्याच्या प्रत्येक पोस्टला त्याच्या चाहत्यांकडून चांगलीच पसंती मिळत असते.

अभिनेता रितेश देशमुख सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो,तो नवनविन व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच पोस्ट करत असतो,त्याच्या प्रत्येक पोस्टला त्याच्या चाहत्यांकडून चांगलीच पसंती मिळत असते,दरम्यान रितेशचा चाहता वर्ग देखील फार मोठा आहे.

सध्या रितेश देशमुख त्याच्या एका नव्या व्हिडिओमुळे सध्या चर्चेत आला आहे.प्रत्येक दिवाळीला आपण नवनविन कपडे घेत असतोच,दरम्यान रितेशने त्याच्या मुलंसाठी दिवाळीचे नवे कपडे घेतले आहेत. पण हे कपडे दुकानातून आणलेले नसून अतिशय खास आहेत. देशभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. दिवाळी म्हटलं की दिवे, कंदील, फटाके, फराळ आणि नवीन कपडे हे आलंच. अनेकजण दिवळीत नवे कपडे घेतात.

अभिनेता रितेश देशमुखने ही त्याच्या मुलांसाठीही नवे कपडे घेतले आहे. पण हे कपडे दुकानातून विकत न घेता अतिशय खास पद्धतीने शिवून घेतले आहेत. रितेश देशमुखने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्याने व्हिडिओ शेअर करत त्याच्या मुलांचे, तसंच त्याच्या नव्या कपड्यांची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे.या व्हिडिओमध्ये रितेश यांच्या आई देखील दिसून आल्या आहेत. या फोटोमध्ये रितेश देशमुखसह त्याच्या दोन्ही मुलांनीही सारख्याचं रंगाचे, सारख्या डिझाइनचे कुर्ते शिवून घातले आहेत. आणि तिघांनी सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. रितेश आणि त्याच्या मुलांनी घातलेले कुर्ते हे रितेशच्या आई यांच्या जुन्या साडीपासून तयार केले आहेत. रितेशनने त्याच्या आईच्या जुन्या साडीपासून त्याला आणि त्याच्या मुलांसाठी दिवाळीचे नवे कपडे तयार केले असल्याचं त्याने म्हटलं आहे. रितेशने व्हिडिओ शेअर करत, आईची जुनी साडी… मुलांना दिवाळीसाठी नवे कपडे असं कॅप्शन दिलं आहेत.

अनेकांनी रितेशच्या व्हिडिओवर कमेंट आणि लाईकचा वर्षाव केला आहे. आणि त्याच्या या गोष्टीचं कौतुक देखील केलं आहेत. तसंच अनेकांनी बॉलिवूडच्या झगमगाटातही तु तुझ्या लहान मुलांवर अतिशय चांगले संस्कार करत असल्याचं म्हणत रितेशचं कौतुक केलं आहे. दिवाळीच्या सणाला अशाप्रकारचा पोशाख फक्त रितेश देशमुखचं कुटुंबच करू शकतं, असं म्हणत चाहत्यांनी रितेशचं अभिनंदन केलं आहे. तुम्ही मुलांना संस्कार दिले, मोठ्यांचा आदर करायला शिकवलं, तुम्ही मनाने अतिशय श्रीमंत असल्याची कमेंटही रितेशच्या चाहत्यांनी केली आहे.


दरम्यान, रितेश देशमुख – जिनिलियासोबत अनेकदा त्यांची मुलंही विमानतळ किंवा इतर विविध ठिकाणी दिसतात. त्यावेळी रितेशची मुलं मीडियाला आदराने नमस्कार करुन कॅमेरासाठी पोज देतात. त्याने मुलांवर केलेल्या या संस्काराचं, मुलांना आदराने वागण्याची शिकवण दिल्याचं म्हणत नेटकऱ्यांकडून रितेश-जिनिलियाचं कौतुक होतं.दरम्यान रितेश आणि जिनिलियाला महाराष्ट्राचे दादा-वहिनी म्हणुन खास ओळखलं जातं.

हे ही वाचा : 

गोविंदबागेतल्या दिवाळीसाठी अजित पवार अनुपस्थित

 ‘टायगर ३’ ने दोन दिवसांत बॉक्स ऑफिसवर जमवला १०० कोटींचा गल्ला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss