spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

बॉक्स ऑफिसवर शाहरुखच्या ‘डंकी’ ची निराशाच,कमाईत अपयशी

 बॉलिवूडचा बादशाहा शाहरुख खान सध्या ‘डंकी’ चित्रपटसाठी चर्चेत आहे.हा चित्रपट  21 डिसेंबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे.

 बॉलिवूडचा बादशाहा शाहरुख खान सध्या ‘डंकी’ चित्रपटसाठी चर्चेत आहे.हा चित्रपट  21 डिसेंबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे.खरतर या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होती,पहिल्या दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली घौडदौड चालू ठेवली होती,मात्र आता शाहरुखच्या डंकीला चांगलच ग्रहण लागलं आहे,असं म्हणायला देखील काही हरकत नाही.दरम्यान या वर्षातला त्याचा हा तिसरा चित्रपट आहे.जवान आणि पठाण चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच जम बसवला होता.मात्र डंकी हा चित्रपट कुठे तरी मागे पडला आहे.हा चित्रपट कमाई करण्यात कमी पडला आहे.

दरम्यान या चित्रपटासाठी प्रेक्षक उस्तुक होते,मात्र प्रभासच्या सालार चित्रपटाने शाहरुखच्या ‘डंकी’ चित्रपटाचा चांगलाच डंका वाजवला आहे.सालार चित्रपट बॉक्स ऑफिसवर सध्या धुमाकुळ घालत आहे.तर सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, ‘डंकी’ या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी अर्थात ओपनिंग डेला 29.2 कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी 20.12 कोटी, तिसऱ्या दिवशी 25.61 कोटी आणि चौथ्या दिवशी 31.5 कोटींची कमाई केली. तसेच पाचव्या दिवशी या सिनेमाने 22.50 कोटींची कमाई केली. 

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते राजकुमार हिरानी यांनी ‘डंकी’ या चित्रपटाच दिग्दर्शन  केलं आहे. या सिनेमाच्या माध्यमातून शाहरुख खान आणि राजकुमार हिरानी यांनी पहिल्यांदाच एकत्र काम केलं आहे.या सिनेमात शाहरुख खान मुख्य भूमिकेत आहे. तर तापसी पन्नू आणि किंग खानची केमिस्ट्री चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. ‘डंकी’ या सिनेमात विकी कौशल आणि बोमन ईरानीदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

शाहरुख खानचा ‘डंकी’ हा सिनेमा 21 डिसेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तर 22 डिसेंबर 2023 रोजी प्रभासचा ‘सालार’ हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. बॉक्स ऑफिसवर हे दोन्ही सिनेमे आमने-सामने आहेत. पण ‘डंकी’ पेक्षा ‘सालार’ने सर्वाधिक कमाई केली आहे.

रेड चिलीज एंटरटेनमेंटच्या बॅनरअंतर्गत ‘डंकी’ या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. रिलीजच्या पाच दिवसांत जगभरात या सिनेमाने 200 कोटींचा टप्पा पार केला आहे. जगभरातील बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने 206 कोटींचा गल्ला जमवला आहे. ‘डंकी’ या सिनेमाचं एकीकडे कौतुक होत आहे. तर दुसरीकडे काही प्रेक्षकांनकडून चित्रपटाबाबत निराशाच पाहायला मिळत आहे.

हे ही वाचा:

शुभमंगल सावधान;स्वानंदी-आशिषची ‘आनंदी’ साथ,विवाहसोहळा पडला पार

ख्रिसमसच्या खास दिवशी आलिया-रणबीरने दाखवला राहाचा चेहरा,व्हिडिओ व्हायरल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss