spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

हृतिक–दीपिकाच्या आगामी  ‘फायटर’ सिनेमाचा जबरदस्त टीझर प्रदर्शित

या चित्रपटातील हृतिक,दीपिका आणि अनिल कपुर यांचे लूक आउट करण्यात आले आहे.तर नुकतच या चित्रपटाचा आता टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.

बॉलीवूड अभिनेता  हृतिक रोशन आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या आगामी फायटर या चित्रपटासाठी चर्चेत आहेत.काही दिवसांपुर्वी या चित्रपटातील हृतिक,दीपिका आणि अनिल कपुर यांचे लूक आउट करण्यात आले आहे.तर नुकतच या चित्रपटाचा आता टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.देशभक्तीवर आधारित असलेल्या चित्रपटाचा टीझर चाहत्यांच्या चांगल्याच पसंतीस उतरला आहे.दरम्यान आता प्रेक्षक यांच्या’फायटर’या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

हृतिक रोशन – दीपिका पदुकोण – अनिल कपूर यांच्या ‘फायटर’ या चित्रपटाच्या  टीझरमध्ये सुरुवातीला हृतिक रोशन चालत येत असलेला दिसतो. पुढे वायुसेनेची थरारक कामगिरी पाहायला मिळते. टीझरमध्ये दीपिका – अनिल कपूर सुद्धा तडफदार भूमिकेत पाहायला मिळतात.टीझरच्या शेवटी हृतिकच्या मागे भारताचा तिरंगा पाहयला मिळतो यावेळी हा सीन पाहुन अगदी हृदय भरुन येत.आणि भारतीय वायुसेनेचा अभिमान देखील वाटतो.एकूणच ‘फायटर’ सिनेमा थिएटरमध्ये पाहणं ही सर्वांसाठी पर्वणी असणार यात शंका नाही.’फायटर’ या  चित्रपटामध्ये हृतिक हा स्क्वाड्रन लीडर समशेर पठानिया ही भूमिका साकारणार आहे. तर दीपिका ही या चित्रपटात स्क्वाड्रन लीडर मीनल राठोड ही भूमिका साकारणार आहे. चित्रपटातील कॅप्टन जय सिंह उर्फ रॉकी ही भूमिका अनिल कपूर हे साकारणार आहेत.

25 जानेवारी 2024 रोजी फायटर हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून हृतिक  आणि दीपिका हे पहिल्यांदाच  स्क्रिन शेअर करणार आहेत. काही दिवसांपूर्वी फायटर या चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज करण्यात आलं होतं.  आता प्रेक्षक या चित्रपटाच्या टीझरची उत्सुकतेने वाट बघत आहेत.

फायटर या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सिद्धार्थ आनंद यांनी सांभाळली आहे. सिद्धार्थ यांचा हृतिकसोबतचा हा तिसरा चित्रपट असणार आहे.याआधी दोघांनी ‘वॉर’, ‘बँग बँग’ या चित्रपटांसाठी एकत्र काम केले आहे. ‘वॉर’, ‘बँग बँग’ या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. आता फायटर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती गल्ला जमवणार ? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.दरम्यान हृतिक आणि दीपिका यांची जोडी प्रेक्षकांच्या कितपत पसंतीस उतरणार हे पाहणं देखील औस्तुकत्तेचं ठरणार आहे.

हे ही वाचा:

सगळे करप्ट पार्टीत आहेत मग नवाब मालिकांवरच हल्ला का?, संजय राऊत

अंबादास दानवे यांचा प्रवेश झाल्याचे जाहीर करून टाका; प्रविण दरेकरांचा खोचक टोला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss