Wednesday, September 25, 2024

Latest Posts

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेचा भन्नाट डान्स व्हायरल

गौरव मोरे करतोय दिल वाले दुल्हनिया ले जायेंगे या चित्रपटातील हो गया है तुझको तो प्यार सजना या गाण्यावर डान्स

छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्य’ जत्रा या कार्यक्रमातील कलारांनी त्यांच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. अभिनेता गौरव मोरे (Gaurav More) हा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला  आहे.”गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा” या गौरवच्या जबरदस्त डायलॉगनं तर प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. गौरव हा सोशल मीडियावर वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ शेअर करतो. नुकताच गौरवनं सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. त्याच्या या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

गौरवनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो दिल वाले दुल्हनिया ले जायेंगे या चित्रपटातील हो गया है तुझको तो प्यार सजना या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. गौरवच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. गौरवनं या व्हिडीओला कॅप्शन दिलं, “DDLJ Fever”

‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेच्या माध्यमातून गौरवने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. तो विविध कार्यक्रमांमध्ये देखील हजेरी लावतो. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे गौरवला विशेष लोकप्रियता मिळाली. या कार्यक्रमातील गौरवच्या विनोदी शैलीला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील अनेक कलाकारांना त्यांच्या विनोदी अभिनयाकरिता प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. या कार्यक्रमाच्या आगामी एपिसोड्सची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात.

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss